Amazon

Wednesday, August 29, 2012

हळूंच या हो हळूंच या !

हळूंच या हो हळूंच या ! llध्रु०ll

गोड सकाळीं ऊन पडे
दंवबिंदूंचे पडति सडे
हिरव्या पानांतुन वरती
येवोनी फुललों जगतीं
हृदयें अमुचीं इवलींशीं
परि गंधाच्या मधिं राशी

हांसुन डोलुन
देतों उधळुन
सुगंध या तो सेवाया
हळूंच या पण हळूंच या ! ll१ll

कधिं पानांच्या आड दडूं
कधिं आणूं लटकेंच रडूं
कधिं वार्‍याच्या झोतानें
डोलत बसतों गमतीनें
तर्‍हेतर्‍हेचे रंग किती
अमुच्या या अंगावरतीं
 निर्मल सुंदर
अमुचें अंतर
या आम्हांला भेटाया
हळूंच या पण हळूंच या ! ll२ll


- कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment