Amazon

Tuesday, December 29, 2015

तुला आठवतंय?

तुला आठवतंय? ते कलकलतं ऊन होतं.
ज्वारीच्या ताटव्यात तृषार्त वेदना होत्या.
वडाच्या पारंब्यांना जमिनीची ओढ
आणि तापल्या धुळीला वाऱ्याची.
अशा दुपारी तुझे पैंजण ऐकले
बांधावरच्या सावलीचा पुंजका टाकलेल्या बाभळीनं.
तुला आठवतंय?
माझ्या सायकलच्या प्यांडलची लय
अजून तुझ्या छातीत धडधडत असेल,
मला अजूनही खात्री आहे.
सर्वत्र लाहीलाही करणारी तप्तं भूमी,
आणि तुझ्या माथ्यावर पाण्याचा हंडा.
ती दुपार, ते ऊन, ती धूळ
आणि श्वास? तेही ऊष्ण.
तू गेलीस त्या वाटेवर आजही पावा घुमतो,
तू गेलीस त्या वाटेवर आजही ते ऊन तसच पसरलेलय.
तू गेलीस त्या वाटेवर आजही ते ऊन तसच पसरलेलय.
तू गेलीस तो बांध, ती बाभळ, तो मी. आम्ही सारे सारे तसेच आहोत.
तू गेलीस, चैतन्य गेलं. आता उरावे रिकामे भांडे, फक्त उपयोगापूरते.
यंदाच्या हंगामात राणाला जेंव्हा नवे कोंब फुट्तील, बाभळीला पिवळी फूलं येतील,
तेंव्हा परत येशील? येशील ना?
——– सुंबरानं चित्रपटातील कविता ——-

२७. चाहूल ( इयत्ता दुसरी, १९९० )