Amazon

Saturday, April 16, 2011

"Stay Hungry Stay Foolish" - Steve Jobs.

apple कंप्युटर्स  या जगातील सवार्त क्रिएटीव समजल्या जाणार् या कंपनीचा सीइओ स्टीव जॉब्ज यांचे Stay
Hungry. Stay Foolish हे  वाक्य खुपच प्रसिद्ध  आहे  स्टीव यांनी १२ जुन २००५ साली स्टॅन फोर्ड
युनीवसीर्टी येथे केलेल्या एका भाषणामध्ये हे वाक्य उद्गारले होते. त्याच भाषणाचा स्वैर अनुवाद मी
वाचकांसाठी येथे देत  आहे . मी वाचलेल्या आणि ऐकलेल्या भाषणांपैकी सवोर्त्तम भाषण आहे .

                       जगातील सवोर्त्तम विद्यापीठांमध्ये ज्याची गणना केली जाते अशा विद्यापीठाच्या समारंभामध्ये भाषण करण्यासाठी बोलावले हा मी माझा सन्मान समजत्तो. खरे सांगायचे तर मी कोणत्याही कॉलेजमधुन पदवी प्राप्त केलेली नाही, त्यामुळे कदाचीत आजचे माझे भाषण हे  कॉलेज आणि  पदवी या  विषयांशी आलेला माझाआज पर्यंतचा सर्वात  जवळचा संबंध आहे . आज मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे . होय माझ्या आयुष्यात घडलेल्या फक्त तीन गोष्टी. बाकी काहीही नाही.

पहीली गोष्ट -
मी रीड कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर फक्त ६ महीन्यातच कॉलेज सोडले. आणि  त्यानंतर सुमारे १८ महीने तेथेच कॉलेज ड्रॉपआउट म्हणुन रेंगाळलो पण त्यानंतर कॉलेज पुणर्पणे सोडुन दिले. मी कॉलेज का सोडले? याची कथा सुरु झाली माझ्या जन्माच्या आधीपासुन. माझी आई ही एक तरुण, लग्न न झालेली कॉलेज विद्यार्थिनी  होती. माझा जन्म व्हायच्या आधीच तीने मला दत्तक द्यायचे ठरवले होते. मात्र तीची एक ईच्छा होती की माझे भावी पालक हे किमान पदवीधर असावेत. त्यापर्माणे एक वकील आणि  त्याची उच्चशीक्षीत पत्नी मला दत्तक घेण्यासाठी राजी झाले. मात्र त्यांना एखादी मुलगी दत्तक घ्यायची होती. माझ्या जन्मांनंतर , मी मुलगा आहे हे  कळल्यावर त्यांनी मला दत्तक घेण्याचा विचार बदलला. मला दत्तक घेण्यासाठी राजी असलेल्या (वेटींग लिस्टवरील) दुसर् या जोडप्याने मात्र मला स्वीकारले. पण माझे भावी पालक पदवीधर नसल्याने माझ्या आईने कागदपत्रावर सही करण्यास नकार दीला. मला कॉलेजला पाठवायचे आश्वासन त्या जोडप्याने दील्यानंतरच माझ्या आईने मला दत्तक देण्यासाठी कागदपत्रावर सही केली. आणि  त्यानंतर १७ वषार्ंनी मी कॉलेजला गेलो देखिल.मी निवडलेले कॉलेज फार महागडे होते आणि  माझ्या मध्यमवगीर्य पालकांनी मेहनतीने जमवलेल्या पैशांचाबराचसा भाग माझ्या शिक्षणासाठी खर्च होत होता. कॉलेजमध्ये सहा महीने घालवल्यानंतर की मला कॉलेजमध्ये अजीबात रस वाटत नव्हता. मला काय करायचे आहे, कोणते क्षेत्र निवडायचे आहे याबाबतीत काहीच निर्णय होत नव्हता. हे कॉलेज मला ती उत्तरे शोधुन देइल असेही वाटत नव्हते. शेवटी मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा हा निर्णय खुपच धाडसी होता आिण मला त्याबद्दल भीतीदेखील वाटली होती. पण आता मागे वळुन पाहताना असे वाटते की मी आजवर घेतलेल्या निर्णयापैकी तो सर्वोत्तम  निर्णय होता. आता कॉलेज नसल्यामुळे मी इतर सर्व क्लासेसही बंद करुन टाकले होते.आणि  मला आवड असलेल्या विषयांशी संबंधीत क्लासेसच्या शोधात होतो. पण हे तीतकेसे सोपे नव्हते. मला हॉस्टेलची सुवीधा नसल्याने मी एका मित्राच्या घरी जमीनीवर झोपत असे. जुन्या कोकच्या बॉटल्स जमा करुन आणि  विकून  मिळनार्या  या ५सेंट्स मधुन माझा जेवनाचा प्रश्न  सोडवत असे. आणि दर रवीवारी हरे कृ ष्णा मंदीरामध्ये मिळणार्या चांगल्या जेवणासाठी ७ मैल चालत जात असे. रीड कॉलेजमध्ये त्यावेळेस सर्वात चांगले कॅलीग्राफीचे  (Calligraphy - सुलेखन)क्लासेस चालवले जात असत. आता इतर रेग्युलर विषयांची चिंता नसल्याने मी कॅलीग्राफीच्या क्लासेसमध्ये जाण्याचे ठरवले. तेथे मी सेरीफ आिण सॅनसेरीफ आदी लिपी (Fonts) शिकलो.अक्षराची जाडी, वळणे, दोन अक्षरांमध्ये ठेवावयाचे अंतर इत्यादी गोष्टी मी तेथे तपशीलात शिकलो. तसे सर्व  व्यावहारीक गोष्टींसाठी माझ्या या कलेचा मला काहीच फायदा होणार नव्हता. पण त्यानंतर दहा वषार्ंनी जेव्हा आम्ही पहीला मॅकींतॉश संगणक डीझाईन केला तेव्हा मला याचा भरपुर फायदा झाला. त्यावेळी घेतलेल्या कॅलीग्राफीच्या ज्ञानाचा वापर करुन मी अनेक डीझाइनर फाँट्सचा वापर संगणकामध्ये करण्याची प्रथा सुरु केली. पुढे मिक्रोसॉफ्टने आमची कॉपी करुन निवन निवन फाँट्स उपलब्ध करुन दीले. जर मी तेव्हा कॅलीग्राफी शिकलो नसतो तर कदाचीत आज सवर्च संगणक इतके सुन्दर आणि  सोपे झाले नसते. एकुणच मागे वळुन पाहताना आपल्याबरोबर जे जे काही घडते ते सारेच व्यर्थ नसते आणि सर्व गोष्टी तसेच अनुभव आपल्याला जागोजागी उपयोगी पडत असतात. गरज असते ती फक्त अशा आयुष्यातील अनेक घटनांना बिंदु मानुन त्यांना एकत्र जोडण्याची. तेव्हाच आपल्या आयुष्याची रेषा पूर्ण होते. अथार्त आपल्याला ते बिंदु दिसत नाहीत, ते कळतात फक्त भूतकाळात डोकावुन पाहताना . पण एक विश्वास दॄढ असला पाहीजे की अनेक घटना आपल्या आयुष्यात बिंदु बनुन येत आहेत. आणि हे बिंदु जोडुनच आयुष्य बनणार आहे. हा माझा विश्वासच मला सदैव उपयोगी पडला आहे.

दुसरी गोष्ट -
मी स्वतःला खुप भाग्यशाली समजतो कारण मला आयुष्यात पुढे काय करायचे आहे ते मला खुप लवकर समजले. वॉझ आिण मी मिळून माझ्या पालकांच्या गॅरेजमध्ये apple कंप्युटर्स चालु केली तेव्हा मी अवघा वीस वषार्चा होतो. आम्ही खुप मेहनत करुन फक्त दहा वषार्त apple ला  इतकी मोठी केली की apple मध्ये ४००० कमर्चारी आले आणि apple ची वाषीर्क उलाढाल २ बिलीयन डॉलर्स इतकी झाली होती. तेव्हाच आम्ही आमचा सवोर्त्कृष्ट आविष्कार मॅकींतॉष संगणक बाजारात आणला होता. आिण त्यानंतर एका वर्षातच मी ३० वषार्चा झालो होतो. आणि तेव्हाच मला aaple  मधुन काढुन टाकण्यात आले. तुम्ही म्हणाल की ज्याने कंपनी सुरु केली त्यालाच कसे काढुन टाकता येइल. पण असे झाले होते. apple च्या वाढत्या पसार्याला सांभाळण्यासाठी आम्ही एका व्यक्तीची नेमणुक केली होती. आमच्या मते ती व्यक्ती या कामासाठी सर्वोतोपरी पात्र होती. त्यानंतर पहीले वर्ष तसे चांगले गेले पण नंतर आमच्या मध्ये काही मतभेद आणि  दुरावे निमार्ण झाले. आमच्या सर्व  डायरेक्टसर्नी त्या व्यक्तीची बाजु घेतली आणि  मला बाहरे काढुन टाकले. मी सर्व समक्ष बाहरे गेलो होतो. माझी हार अगदी खुलेपणाने सर्वाच्या चर्चेची  विषय बनली होती. ज्या कंपनीसाठी मी गेली दहा वर्ष झटलो होतो, जीच्यासाठी मी माझ्या तारुण्यातील मह्त्वाची वर्षे अक्षरक्षः वाहीली होती आज मी त्याच कंपनीतुन बाहेर हाकललो गेलो होतो. हा माझ्यासाठी खुप मोठा धक्का होता, मला सेलीकॉन व्हॅलीमधुन पळुन जावेसे वाटत होते. पण एक गोष्ट हळुहळु माझ्या लक्षात येउ लागली होती की मला माझे काम अजुनही तितकेच आवडत होते. Apple  मध्ये माझ्यासोबत्त जे काही झाले त्यामुळे माझ्या कामावरील प्रेमात तसुभरही फरक पडला नव्हता. म्हणुन मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचा निणर्य घेतला. आता मागे वळुन पाहताना वाटते की Apple मधुन बाहरे हाकलला जाणे ही माझ्यासोबत घडलेली सर्वात चांगली गोष्ट होती. यशाचं ओझं मनावर बाळगण्यापेक्षा आता मला नविन सुरुवात करण्याची संधी मिळाल्यामुळे हलकं हलकं वाटत होते. मला माझ्या आयुष्यातील सर्वात  सृजनशील (Creative) काळ त्यामुळेच उपभोगता आला. पुढील पाच वर्षात मी नेक्स्ट(NeXT) आिण पिक्सार (Pixar) अशा दोन कंपन्या चालु केल्या आणि त्याचदरम्यान लॉरेन नावाच्या एका तरुणीच्या प्रेमात पडलो आणि तीच्याशी लग्न केले. पिक्सारनेच पुढे "टॉय स्टोरी" नावाची संगणकावर बनलेली जगातील पहीली अनीमेशन फील्म बनवीली, आणि  आज पिक्सारची गणना जगातील सवोर्त्कृष्ट अनिमेशन स्टुडीओ मध्ये केली जाते. पुढे असे काही घडलं ज्याची मी कल्पनाच केली नव्हती. apple ने माझी नेक्स्ट ही कंपनी विकत घेतली आणि त्याद्वारे मी पुन्हा Apple मध्ये दाखल झालो. मला सांगण्यास अभिमान वाटतो की नेक्स्टमध्ये मी जे तंत्रज्ञान विकसीत केले होते, तेच तंत्रज्ञान आज Appleच्या पुनरुज्जीवनास कारणीभुत ठरले आहे. मला खात्री  आहे   की जर मला apple मधुन काढण्यात आले नसते तर आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी कधीच घडल्या नसत्या.ते एक कडवट औषध होते यात काही वाद नाही पण पेशंटला त्याची गरज होती हे देखील तीतकेच खरे. कधीकधी आयुष्यात बरीच अनाकलनीय वळणे येतात, अशा वेळेस तुमचा विश्वास ढळु देउ नका. मला हे सर्व करण्याचे सामर्थ्य देणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे माझे माझ्या कामावरील प्रेम. तुमच्या आयुष्यातील बराचसा भाग तुम्ही करत असलेल्या कामाने व्यापलेला असतो. आपल्याला आवडणारे काम करण्यातच खरे समाधान लपलेले असते. जर तुम्हाला तुमचे आवडते काम मिळाले नसेल किंवा काय करायला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते हे कळले नसेल तर त्याचा शोध घ्या आणि  जोपर्यंत  या पर्श्नाचे उत्तर मिळत नाही तोपयर्ंत शोधत रहा. एक दिवस तुम्हाला ते नक्की मिळेल.

तीसरी गोष्ट -
मी सतरा वर्षाचा असताना माझ्या वाचण्यात एक वाक्य आले होते," जर तुम्ही आयुष्यातील प्रत्येक दीवस हा शेवटचा दीवस आहे असे मानलेत, तर एक दीवस तुम्ही नक्की बरोबर (Correct) असाल". त्या वाक्याचा माझ्या मनावर खुप खोलवर प्रभाव पडलाय. आणि तेव्हापासुन गेले ३३ वषेर् मी दररोज आरशासमोर उभा राहुन स्वतःला एक प्रश्न  विचारतो," जर आज माझ्या आयुष्यातील शेवटचा दीवस असता तर मी तेच केले असते का जे मी आज करायला जाणार आहे?". जेव्हा लागोपाठ बरेच दीवस उत्तर "नाही" असे येते तेव्हा काहीतरी बदल केला पाहीजे हे मला कळु लागते. लवकरच मी मरणार आहे याची सतत जाणीव असणे यासारखा दुसरा उपाय नाही असे मला वाटते. आयुष्यातील सवार्त मोठे निणर्य घेताना मला या जाणीवेचा नेहमीच फायदा होतो. कारण इतर सर्व आशाअपेक्षा, मानस्न्मान, गर्व, काम करण्याची लाज, हरण्याची भीती आदी सर्व भावना या मरणापुढे दुय्यम ठरतात.आज ना उद्या तुम्ही मरणार आहात याची जाणीव असली की मग कसलीच भीती उरत नाही. काहीच हरवण्याची  किंवा  स्वतः हरण्याची भीती देखील राहत नाही. तुमच्या मनाचा आवाज ऐकण्यापासुन् कोणीच तुम्हाला रोखु शकत नाही.एका वर्षापूर्वी मला कॅ न्सर असल्याचे निदान करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजता माझे स्कॅन करण्यात आले आणि  संध्याकाळी रीपोटर् आल्यावर मला कॅन्सर झाल्याचे  निष्पन्न झाले. डॉक्टसर्च्या मते हा कॅन्सर बरा होण्यापलीकडचा होता, त्यांनी मला सरळ शब्दांत सांगीतले की मी जास्तीत जास्त ३ ते ६ महीने जगु शकतो.माझ्या डॉक्टरने मला घरी जाउन शक्य तीतक्या गोष्टी आटोपण्याचा सल्ला दीला. याचाच अर्थ मला मी गेल्यानंतर माझ्या कु टुंबाला कमीत कमी त्रास व्हावा म्हणुन सर्व गोष्टी करायच्या होत्या, पुढच्या १०-१२ वर्षात माझ्या मुलांना जे सांगायचे होते ते सांगण्यासाठी आता माझ्याकडे काही महीन्यांचा अवधी होता.मला शक्य तीतक्या नातेवाईकांचा आणि   मित्रांचा निरोप घ्यायचा होता. त्याच दीवशी संध्याकाळी बायॉप्सी करण्यात आली. माझ्या घशाद्वारे एक एक एंडोस्कोप आत ढकलण्यात आला. माझ्या पोटाद्वारे आतड्यांमधुन पुढे जात स्वादुपिंडामधुन एक सुइने ट्युमरमधील पेशी काढण्यात आल्या. या सर्व प्रक्रिये आधी मला बेशुद्ध करण्यात आले होते. मात्र नंतर माझ्या बायकोने सांगीतले की त्या पेशी मायक्रोस्कोपखाली पाहुन डॉक्टर्स अक्षरक्षः रडु लागले कारण मला झालेला स्वादुपींडाचा कर्करोग हा ऑपरेशनने बरा होणार् या अतीशय दुर्मीळ प्रकारचा कॅन्सर होता. मी लगेचच ऑपरेशन करुन घेतले आणि  आज मी ठणठणीत बरा आहे. माझा मृत्युशी झालेला तो सर्वात जवळचा सामना होता. म्हणूनच मी मगाशी खात्रीपुवर्क सांगु शकलो की मरणासारखा दुसरा उपाय नाही. मरणाशी संबंधीत एक तत्त्वज्ञान मात्र  मला जरुर कळले. कोणालाही मरायला आवडत नाही. ज्याला स्वर्गात जायची इच्छा आहे असा माणुसदेखील त्यासाठी आधी मरायला तयार नसतो. आणि  तरीदेखीलआपल्या सर्वानाच एक ना एक दीवस मरण पत्करायचे असते. कोणाचीच यातुन सुटका नाही. खरेतर मृत्यु हा विधात्याने लावलेला सर्वश्रेष्ठ शोध आहे. त्यामुळेच जुने संपुन नव्याकरीता मार्ग मोकळा होतो. आज तुम्ही नविन आहात पण लवकरच तुम्ही देखील जुने व्हाल. कीतीही नाट्यमय वाटले तरी मी बोलतोय ते सत्य आहे  आपल्याकडे  खरचं खुप मयार्दीत वेळ आहे हा वेळ कुणा दुसर्यांच आयुष्य जगण्यात घालवु नका. इतरांच्या मतांच्या गोंधळात स्वतःच्या मनाचा आवाज दबु दउे नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला जे आवडते, जे करायचं आहे तेच करा. बाकी सगळं दुय्यम. माझ्या तरुणपणी स्टीवर्ट बर्ँड नावाच्या युवकाने संपुर्ण जगाचा संदर्भ ग्रन्थ बनवला होता. तेव्हा संगणक नसल्यामुळे तो टाइपरायटरवर लिहून आणि कॅमेर्याने टीपलेल्या चित्रांच्या  सहाय्याने बनवलेला होता. तो ग्रन्थ म्हणजे जणु छापील गुगल होते. गुगल यायच्या ३५ वषेर् आधी हा संदर्भ ग्रन्थ प्रकाशीत झाला होता. त्या ग्रंथाच्या शेवटच्या पानावर स्टीवटर् बर्ँडने जाताजाता एक वाक्य लिहीले होते, "Stay Hungry, Stay
Foolish" . मी नेहमीच या वाक्याचा अवलंब केला. आणि आता तुम्ही पदवी घेउन एका नवीन आयुष्याला
सुरुवात करत आहात म्हणून मी तुम्हालाही याच शुभेच्छा देतो, "Stay Hungry, Stay Foolish".