Amazon

Saturday, February 5, 2011

लोकसत्ता ५ फेब्रुवारी ...................I like very much

आई - बाबा यांस,
कोणी वेळ देता का वेळ?
उमलणाऱ्या कळीला, उमलणाऱ्या कळ्याला
हसणाऱ्या कळीला, बागडणाऱ्या कळ्याला
रुसणाऱ्या कळीला, रडणाऱ्या कळ्याला
कोणी वेळ देता का वेळ?
तुमच्या प्रेमाने मातणार नाही.
तुमच्या रागावण्याने उतणार नाही.
कोणी वेळ देता का वेळ?
नका ठेवू पाळणाघरात..
नका पाठवू बालमंदिरात..
कोणी वेळ देता का वेळ?
सकाळी जाता सोडून,
संध्याकाळी नेता दमून
कोणी वेळ देता का वेळ?
नको आकर्षक रंगीत खेळणी,
नको चकचकीत ड्रेस भारी
कोणी वेळ देता का वेळ?
असू देत नेहमी तुमच्यात संवाद
नका घालू आपसात वितंडवाद
कोणी वेळ देता का वेळ ?
तुमचा ब्लॉक , तुमची गाडी
तुमची प्रतिष्ठा तुमचे स्मार्ट मूल
कोणी वेळ देता का वेळ ?
तुमचे पॅकेज ,तुमची पार्टी
तुमचे काम, तुमचे स्थान
कोणी वेळ देता का वेळ?
पुढे करा आपला हात
हातात घ्या आमचा हात
कोणी वेळ देता का वेळ?
नका बनू आमचे मालक
व्हा त्यापेक्षा सुजाण पालक
कोणी वेळ देता का वेळ?
ठेवा आपल्या ध्यानात,
ठेवा आपल्या मनात,
मूल वाढवणे नसे हा पोरखेळ
कोणी वेळ देता का वेळ?

No comments:

Post a Comment