Amazon

Wednesday, June 24, 2015

मेणवली घाट , वाई -सातारा

 मेणवली घाट , वाई -सातारा

आपण हा घाट अनेक हिंदी चित्रपटांमधे पाहिला असेलच ,
उत्तरप्रदेश,बिहार मधील गावांची नावे वापरली जातात
पण शुटींग मात्र इथेच (आपल्या साताऱ्यात) होत असते
वाईपासून तीन किलोमीटर अंतरावर मेणवली गाव आहे.
या गावाला पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धी मिळाली
ती नाना फडणवीसांनी कृष्णा नदीच्या काठावर बांधलेल्या
भव्य वाड्यामुळे आणि काठावरील मंदिरांमुळे.
फडणवीसांनी मेणवलीत वाडा, अमृतेश्वर मंदिर, विष्णू-लक्ष्मी
(मेणवलेश्वर) मंदिर आणि कृष्णानदीवर घाट बांधला.
नानांचा वाडा गढीवजा असून मराठी वास्तुशैलीचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे.
वाड्याला बाजूने उंच तटबंदी केलेली आहे. नक्षीकाम केलेली पाण्याची कुंडेही पाहावयास मिळतात.
या ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाड्यात असणाऱ्या
जवळजवळ सर्वच खोल्यांमध्ये वेगवेगळ्या पौराणिक कथांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत.
इसवीसन १७७० ते १८०० या दरम्यान काढलेली ही चित्रे आवर्जून पाहण्यासारखी आहेत.
या सर्वांपेक्षा वेगळे चित्र लक्ष वेधून घेते ते म्हणजे मस्तानीला समोर बसवून काढलेले तिचे चित्र.
सातारा ते मेणवली अंतर ३६ किलोमीटर आहे.
वाईपासून पुढे मेणवलीला जाता येते.
या गावाच्या घाटावरील प्रचंड घंटा हेही एक आकर्षणकेंद्र असून,
वाईप्रमाणेच याही गावाला चित्रीकरणासाठी पसंती दिली जाते.
अभिमान वाटला पाहिजे इतकी सुंदर निसर्ग
आणि तितक्याच तोडीची पर्यटन स्थळे आपल्या महाराष्ट्रात आहेत

No comments:

Post a Comment