Amazon

Tuesday, January 3, 2012

आपण भारताचे नागरिक आहोत म्हणुन कंटाळा न करता एवढ वाचा, महत्त्वाचं आहे


◄आपण भारताचे नागरिक आहोत म्हणुन कंटाळा न
करता एवढ वाचा, महत्त्वाचं आहे►


●रामेश्वरम या तत्कालीन मद्रास राज्यातील
बेटासारख्या गावात तामिळ कुटुंबात १५ अक्टोबर १९३१
मध्ये कलाम यांचा जन्म झाला. गावात हिंदु-मुस्लिम
ऐक्य होते. बीएस्सी झाल्यावर कलाम
यांनी मद्रासच्या एमआयटीमध्ये प्रवेश घेतला.


●१९५८ साली ते वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी झाले.
नंतर त्यांनी अंतराळ संशोधनात कार्य केले. भारताचे
पहिले उपग्रह प्रक्षेपक वाहन तसेच "अग्नी" हे
क्षेपणास्त्र आणि १९९८ साली पोखरण येथे करण्यात
आलेला अणुस्फोट या साऱ्यांमध्ये कलाम यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.
राष्ट्रपतीपदावरुन कलाम यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले होते,
देशाच्या उज्ज्वल भवितव्याविषयीमाझी तीन स्वप्ने
आहेत. 


●पहिलं आहे स्वातंत्र्य. भारताने कधीच कोणाचंही स्वातंत्र्य हीरावलेलं नाही तसेच ते कोणावर लादलेलेही नाही. आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने
आपलं स्वातंत्र्य टिकवलं पाहिजे.
ते भक्कम केले पाहिजे. 


माझं दुसरं स्वप्न आहे विकास. आता भारताने स्वतःला विकासनशील देश न समजता विकसित देश मानायला हवे.


माझं तिसरं स्वप्न आहे भारताने जगात ताठ मानेने वावरले पाहिजे. यासाठी केवळ लष्करी क्षेत्रातच नाही तर आर्थिक क्षेत्रातही आपण सामर्थ्यशील
असले पाहिजे.


●पण तुम्ही म्हणता, सरकार निष्क्रिय आहे. तुम्ही म्हणता, आपले कायदे जुने-पुराणे आहेत.
तुम्ही म्हणता, महापालिका कचरा उचलत नाही.
तुम्ही म्हणता, फोन चालत नाहीत. तुम्ही म्हणता, रेल्वे
म्हणजे क्रूर विनोद आहे. काही म्हणतात, आपला देश
खड्डयात चाललाय.


▶पण तुम्ही काय करताय?


▶दुबईमध्ये रमजानच्या काळात तुम्ही सार्वजनिक ठिकाणी आहार घ्याल? 


▶जेद्दाहमध्ये तुम्ही डोकं न झाकता फेरफटका माराल?


▶लंडनमध्ये तुम्ही टेलिफोनच्या कर्मचाऱ्याला पैसे चारुन
आयएसडी,एसटीडी दुसऱ्याच्या नावावर टाकायला सांगाल?


▶वॉशिंग्टनमध्ये
तुम्ही वाह्तुकीच्या नियमांची ऐशी की तैशी कराल?


▶ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर शहाळ पिऊन ते बाजूला फेकून द्याल?


▶टोकियोच्या रस्त्यावर पान खाऊन थुंकाल? बोस्टनमध्ये तोतया उमेदवार परीक्षेला बसवून ती उत्तीर्ण व्हाल?


●मग तुम्ही भारतातच असे का वागता?


●आपण फक्त मतदानाच्या दिवशी मत देऊन सरकार
निवडतो आणि मग आपली जबाबदारी संपली असे
मानतो. सरकारने सर्व काही करावे, पण
आम्ही काहीही करणार नाही,
असा आमचा खाक्या असतो. सरकारने रस्ते साफ करावेत,
पण आम्ही रस्ते घाण करणं चालूच ठेवणार. आम्ही जोरजोराने हुंड्याच्या,
स्त्री भृणहत्येच्या विरुद्ध ओरडणार, पण वेळ आली तर
आम्ही तेच करणार.


●आम्ही म्हणणार, इथली व्यवस्थाच अशी आहे.
मी एकट्याने आवाज उठवून काय होणार?? मग
ही व्यवस्था सुधारणार कोण? मी भारताचा तरुण नागरिक
आहे. माझ्याजवळ तंत्रज्ञान आहे. देशाबद्दल प्रेम
आणि ज्ञान आहे म्हणून मला जाणिव आहे की, छोटं
ध्येय ठेवणं हा गुन्हाच आहे. प्रगत भारताचे माझे स्वप्न साध्य करण्यासाठी ध्येयवादी मनाने काम केले व घाम गाळला तर चैतन्यशील आणि प्रगत भारताचे स्वप्न आपण साकार
करु शकू

No comments:

Post a Comment