Amazon

Friday, December 28, 2012

छ.शिवाजी महाराज की जय


हैदराबादच्या एका व्यक्ती सोबत मराठ्यांच्या पराक्रमांवर चर्चा झाली.त्या व्यक्तीने चर्चेदरम्यान एक गोष्ट अशी विचारली की,मराठे लपून हल्ला करायचे का? मैदानातून पळून जायचे का? मराठे लुटारू होते का? तो म्हणाला की आम्ही असे ऐकले आहे की मराठे लपूनछपून यायचे,लपून छपूनच हल्ला करायचे आणि लुटून पळून जायचे,खुल्या मैदानात मराठे यायला घाबरायचे.

मला त्याच्या बोलण्याचा अजिबात राग आला नाही कारण आपल्या देशात ...खो
ट्या इतिहासाच्या प्रसाराने अशा बऱ्याच अंधश्रद्धा मराठ्यांच्या बाबतीत पसरल्या आहेत.त्या व्यक्तीला मी सांगितले की लपून छपून हल्ला करून,अचानकपने आश्चर्याचा धक्का देणे, काही कळायच्या आत शत्रूला संपविणे हा मराठ्यांच्या गनिमी काव्याचा भाग होता.आणि गनिमी कावा हा कमीत कमी सैन्य कामी आणून यश मिळविण्याचा एक मार्ग होता.

कारण प्रत्त्येक सैनिकाचा जीव महत्वाचा वाटायचा आमच्या राजाला. तरी तो व्यक्ती काहीना काही म्हणून मराठे असे होते,मराठे तसे होते असा म्हणायचा.त्यामुळे मी त्याला सरळ त्याच्या हैदाराबाद्चेच उदाहरण दिले.त्याला सांगितले की छ.शिवाजी महाराज नावाचा मराठा आपली अवाढव्य फौज घेऊन हैदराबाद मध्ये आला होता.

ती फौज तुमच्याच गोलकोंडा फोर्टमध्ये तशीच सोडून कोणताही अंगरक्षक सोबत न घेता तुमच्याच राजाच्या घरात भेटीसाठी गेला होता,महिनाभर राहिला आणि अशावेळी तुमचाच राजा घाबरला होता,कारण आपला राजा दिसत नाही म्हणून मराठा फौजेने हैदराबाद संपविण्याची योजना बनविली होती.

तेव्हा घाबरून तुमच्याच राजाने छ.शिवरायांना विनंती केली होती की कृपा करून आपल्या सैन्याला शांत करा.आणि तसे झालेसुद्धा.आपलेछत्रपती दिसले तेव्हा मराठे शांत झाले होते.एवढेच काय तुमच्या राजाचा अवाढव्य,भयावह हत्ती येसाजी कंक नावाच्या मराठ्याने एकट्यानेच संपविला होता आणि सिद्ध केले होते की एक मराठा हत्तीच्या ताकदीचा असतो.उदगिरीच्यालढाईत जी लढाई खुल्या मैदानात झाली होती.

त्याच लढाईत इब्राहीम गार्दी सारखा तोफखान्याचा प्रमुख समोर असतांनासुद्धा थोड्याशा तोफ्खान्यासह मराठेच जिंकले होते.स्वाल्हेरच्या लढाईत खुल्या मैदानात ४०००० मराठ्यांनी ८०००० मुघलांना कसे कापले होते हे तुम्हाला माहिती आहे का?आणि ज्या औरंगजेबाला पूर्ण देश घाबरायचा त्याच औरंग्याला त्याच्याच दरबारात हाणून पडून बोलून, छाती ताणून ,ताठ मानेन निघून जाणारा राजा मराठाच होता.आणि जेव्हा देशातील सर्व शूरवीर शेपूट घालून बसले होते.

तेव्हा घरापासून ८०० कोस दूर खुल्या मैदानात अफगानांना टक्कर द्यायला निघाले आणि जीवाची बाजी लावली ती मराठ्यांनीच............असे म्हटल्यावर तो जरा गप्प राहिला........तरी म्हणाला की लुटायची काय गरज असायची?

मी त्याला म्हणालो की,मराठ्यांनी लुटली ती त्या त्या राजाची संपत्ती,लुटला शत्रूचा आत्मविश्वास आणि अहंकार आणि त्याचा त्या परीसरावरचा अधिकार..मराठ्यांनी कधीही कोण्या शेतकरयला लुटले नाही,कोण्या सामान्य माणसाला त्रास दिला नाही,कधीही कोणत्याही स्त्रीची अब्रू लुटली नाही.................असे म्हटल्यावर त्याला बोलायला मार्ग राहिला नाही..........मित्रांनो तुम्हाला जर कुणी असे विचारले तर तुम्ही सुद्धा हेच उत्तर द्या...........छ.शिवाजी महाराज की जय. .

Wednesday, December 26, 2012

पल भर की ख़ुशी

जिंदगी में तो ऐसे
बहुत कम मोके आये
जिससे की हम
खुश हो सके |

ऐसा क्यूँ होता है
खुश तो होते है
लेकिन उस ख़ुशी की
 उमर बहुत कम होती है|

लेकिन ये जिंदगी
कितनी भी इतेहां ले ले
हम भी खड़े होगे फिर से
वही पल भर की
ख़ुशी पाने के लिए|
काफी है
यही पल भर की ख़ुशी
पूरी ज़िन्दगी के लिए,

क्यूँ की जब कभी जिंदगी से
माउस हो जाते है  तो
यही ख़ुशी मेरी
हौसला अफजाई करती है|

---------------------------Pramod Damare

Tuesday, December 25, 2012

पाऊस खुळा

पाऊस खुळा, किति पाऊस खुळा !
शिंपडून पाणी, आई ! भिजवि फुला ll धृ.ll

नाचे किती वेड्यापरी,
बडबडे कांहींतरी
झोडपतो उगाच हा वेलीच्या मुला ll १ll

दीनवाणी वेलीबाई,
पांघराया नाहीं कांहीं
काय करू, उघडा हा राहे छकुला ! ll २ll

उचलून आणूं काय,
पुसूं डोकें, अंग, पाय ?
काकडून गेला किती माझा माकुला ! ll ३ll

निजवूं या गादिवर,
पांघरुण घालूं वर,
देऊं काय, सांग आई, आणुन तुला ? ll ४ll

काय– "नको तोडूं फूल,
वेल– पावसाचें मूल ?
ऊन येतां चमकेल त्याचा डोळुला ?" ll ५ll

आणि, येऊं मी घरांत ?
भिजूं नको अंगणांत ?"
नको आई– ! चमकेल मीही आपुला ! ll ६ll

मज वेडा म्हणतील ?
फूल शहाणें होईल ?
मग वेडी म्हणतील सगळे तुला ! ll ७ll


गिरीश

जलदाली

थबथबली, ओथंबूनी खाली आली,
जलदाली मज दिसली सायंकाळी.
रंगही ते नच येती वर्णायातें !
सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता.

व्योमपटीं जलदांची झाली दाटी;
कृष्ण कुणी काजळिच्या शिखरावाणी,
नील कुणी इंद्रमण्यांच्या कांतिहुनि,
गोकर्णी मिश्र जांभळे तसे कुणी;

तेजांत धुमाचे उठती झोत,
चकमकती पांडुरही त्यापरिस किती !
जणुं ठेवी माल भरुनि वर्षादेवी
आणुनिया दिगंतराहुनि या ठाया !

कोठारी यावरला दिसतो न परी.
पाहुनि तें, मग मारुत शिरतो तेथें;
न्याहाळुनी नाहिं बघत दुसरें कोणी
मग हातें अस्ताव्यस्त करी त्यातें.
मधु मोतीं भूवरतीं भरभर ओती !


बालकवी

Saturday, December 22, 2012

मिरागाच्या सरगाला

मिरागाच्या सरगाला
पावसाची दडी
भेगाळली भुई तिची
 आगि मधे उडी

गेला  मिरग कोरडा
माती  कोरडी ठणांन
पाखरांच्या चोचिमधे
वांझोट बियाण

ओलं संपून गेली
डोळे ताम्बुस तहान
आसुसलेल्या बांधावर
हस्ताचे बहाने


माय म्हणायची माझी
आला मुजोर पाऊस
तुझ औक्षण करू दे
नको पारुसा जाऊस

अवेळीच पड़ बापा
माझं मरण भिजू दे
नाही भरलं मन
माझं सरण विझू दे

----------------Poem from Marathi movie Pipaani

शेवटचा लाडू

सुटी संपली नी चाललों गांवाहुन दूर;
आणिक तव नयनीं लोटला अश्रुंचा पूर.
ताप जरी होता तरी पण जागुनियां रात्रीं
मी निजतां करिशी तयारी मजसाठी सारी;
आणिक हे लाडू तुला मी 'नको, नको' म्हणतां,
नकळत मज भरिशी डब्यांतुन तो भरतां भरतां ll १ll

तेच तुझे लाडू सुखानें मी पुरवुन खातां,
आज उरे मागें तयांतिल आवडता सरता.
वाटतसे घाई कशाला मी इतकी केली ?
नाहीं तर असते अधिकसे उरले या वेळीं.
खाऊ नये वाटे तरी पण शिरतो तोंडात,
आणिक मज भासे तुझा हा भरवितसे हात.
तूं असशी जवळीं दूर ना दूर कोंकणांत;
तूं भरवित असशी तुझ्या मी बसलों ताटांत ll२ll

छे, चुकलें, गेलें; संपला शिल्लक जो होता.
छे, चुकलें, आतां भास ना प्रेमळ तो पुढता.
उजाडेल उद्यां आणखी माधुकरी आली;
उजाडेल उद्यां आणखी वारावर पाळी.
उजाडेल उद्यां आणखी भूक मला खाई;
उजाडेल उद्यां आणखी लाडू मज नाहीं
मिळेल जो मजला उद्यां, तो मी गिळणें घांस
मिळेल ना कोठें असा हा, आई, तव भास ! ll३ll


– विंदा करंदीकर

Thursday, December 20, 2012

वेडात मराठे वीर दौडले सात.


।।ॐ शिवछत्रपतयेनमः।।

वेडात मराठे वीर दौडले सात.....
त्या सात योद्धांची नावे
०१) विसाजी बल्लाल.
०२) दीपाजी राउतराव.
०३) विट्ठल पिलाजी अत्रे.
०४) कृष्णाजी भास्कर.
०५) सिद्धि हिलाल.
०६) विठोजी शिंदे
०७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर
बहलोलखान नावाचा आदिलशाही सरदार स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने रयतेवर अन्याय करणे चालू केले. महाराजांनी त्यास धुळीस मिळवण्याचा आदेश प्रतापरावांना दिला.
मराठ्यांच्या गनिमी काव्याने बहलोलखान जेरीस आला. वेळ प्रसंग पाहुन तो मरठयांना शरण आला आला. आता शरण आलेल्याला मारु नये असा हिंदु धर्म सांगतो; त्यामुळे त्या तत्वनीष्ठ मराठ्याने त्याला धर्मवाट दिली, व तो गनीम जिव वाचवून गेला.
पण नंतर दगाबाज बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला. आणि शिवरायांनी रयतेला त्रास देणारा बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांचि पत्र पाठऊन कानऊघडणी केली. त्या पत्रात एक वाक्य होत जे प्रतापरावांच्या जिवास लागल. शिवरायांनी म्हटल होत की बहलोलखानास पकडल्या शिवायमला तोंड दाखवु नये. हे वाक्य वाचुनत्यांनी आपल्या सहा सहकरयांकडे नजर टाकली आणी त्यांनी आपापले भाले सरसावले.त्या सात जणांनी मरणाला समोरा समोर ट्क्कर दीली....

Sunday, December 9, 2012

उन्हें शिकायत है

उन्हें शिकायत है
बार बार गिर कर भी
मेरे उठ खड़े होने से
तेज़ दर्द में भी मुस्कुराने से
कंगाल हो के भी शाहों से जुबां लड़ाने से
इश्वर के अलावा किसी को भी मालिक न मानने से
मेरे खुद को मिटाने और बनाने से
हाँ और
मेरे अनगिन सपनों से ....
उन्हें शिकायत है
मेरी रीढ़ से
मेरी सत्य की

Friday, December 7, 2012

एफ.डी.आय. म्हणजे काय?

सध्या भारतात सर्वत्र एफ.डी.आय. चे वारे वाहत आहेत. एफ.डी.आय. म्हणजे नेमके काय हेसुद्धा धड माहित नसतांना देखील कितीतरी लोक त्याचा अगदी तीव्र विरोध करतांना दिसत आहेत, शिवाय अनेक विरोधी पक्षांना एफ.डी.आय. हे आयतंच कोलीत मिळालं आहे अस म्हणन वावग ठरणार नाही.
मुळात एफ.डी.आय. म्हणजे Foreign Direct Investment अर्थात, परदेशी उद्योग कंपन्या या आपल्या देशात "गुंतवणूक" करून व्यवसाय करू शकतात.
परकीय राष्ट्रांत गुंतवणूक ही दोन प्रकाराने करत येते-
१) त्या राष्ट्रातील उपभोगत्यांना आपल्या राष्ट्रातील फंड्स, शेअर्स इत्यादीची विक्री करणे.
२) त्या राष्ट्रांत प्रत्यक्षपणे उद्योगव्यवसाय सुरु करून उत्पन्न निर्माण करणे.

शिवाय एफ.डी.आय. चे पुन्हा दोन प्रकार आहेत-
१) FDI Inflow( एका विशिष्ट राष्ट्रांत बाहेरील राष्ट्रांकडून येणारी गुंतवणूक),
२) FDI Outflow.(एका विशिष्ट राष्ट्राद्वारे इतर राष्ट्रांमध्ये केली जाणारी गुंतवणूक).
आता या सगळ्या प्रकाराच्या बाबतीत भारताचा विचार केला तर लक्षात येते की, भारताचा FDI Outflow तुलनेने खुपच कमी आहे. अर्थात आजवर, सरकारी आकड्यानुसार म्हटलं तरं ५१%, परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याच्या पूर्वीपर्यंत भारतातील FDI Inflow देखील खूप कमी होता.

अमेरिका, चीन आणि त्यानंतर भारत हा बऱ्याच परकीय कंपन्यांसाठी गुंतवणूकीसाठी आवडीचा पर्याय आहे. खरं तर असे उद्योग आल्याने भारतातील छोट्या उद्योगव्यावसायि­कांना त्याचा फटका बसेल, असा विचार मुळातच चुकीचा आहे.

स्पर्धत आपला निभाव लागणार नाही या भीतीने स्पर्धेत उतरयाचचं नाही, या मानसिकतेतून विकास कदापि शक्य नसतो. महासत्ता बनण्याची स्वप्न बघणाऱ्या भारतासाठी एफ.डी.आय.ला विरोध परवडणारा नाही.
अर्थात इतकी वर्ष हातावर हात ठेवून बसलेल्या  सरकारने, अचानक एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व पक्ष व या क्षेत्रातील तज्ञ लोकांशी सल्लामसलत करणे आवश्यक होतेच.
परंतु अचानक ५१% एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आल्यास आपल्या देशातील इतर छोट्या व्यावसायिकांना त्याच्याशी स्पर्धा करायला वावच राहणार नाही. त्यामुळे ही गुंतवणूक सुरुवातीला कमी प्रमाणात ठेवून मग हळूहळू वाढवत न्यायला हवी. जेणेकरून आपल्या देशातील छोट्या व्यावसायिकांना स्पर्धेची सवय होईल व यांच्या भेसळीतही फरक पडेल.
अशा प्रकारे गुंतवणूक वाढवत नेऊन काही काळानंतर खऱ्या अर्थाने मुक्त अर्थव्यवस्था अस्तित्वात येईल. मात्र स्वत:च्या अस्तित्वाच्या भीतीने परकीयांशी स्पर्धाच न करणे याने आपला विकास खुंटतो.

तेव्हा या नव्या आव्हानांना अधिक गांभीर्याने, सक्षमतेने आणि जबाबदारीने पेलल्यास ती एक लाभदायक संधीच ठरेल यात वादच नाही.