Amazon

Saturday, December 22, 2012

मिरागाच्या सरगाला

मिरागाच्या सरगाला
पावसाची दडी
भेगाळली भुई तिची
 आगि मधे उडी

गेला  मिरग कोरडा
माती  कोरडी ठणांन
पाखरांच्या चोचिमधे
वांझोट बियाण

ओलं संपून गेली
डोळे ताम्बुस तहान
आसुसलेल्या बांधावर
हस्ताचे बहाने


माय म्हणायची माझी
आला मुजोर पाऊस
तुझ औक्षण करू दे
नको पारुसा जाऊस

अवेळीच पड़ बापा
माझं मरण भिजू दे
नाही भरलं मन
माझं सरण विझू दे

----------------Poem from Marathi movie Pipaani

1 comment:

  1. Simply amazing..specially 4th and 5th stanza..keep writing

    ReplyDelete