सूर म्हणतो साथ दे,
दिवा म्हणतो वात दे.
उन्हामधल्या म्हातार्याला
फक्त तुझा हात दे!
आभाळ म्हणत सावली दे
जमीन म्हणते पाणी दे!
माळावरच्या म्हातार्याला
फक्त तुझी गाणी दे!
कावळा म्हणतो पंख दे,
चिमणी म्हणते खोपा दे,
माझ्यासारख्या आजोबाला
फक्त तुझा पापा दे!
-कुसुमाग्रज
-कुसुमाग्रज
No comments:
Post a Comment