आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा || ध्रु ० ||
मायबाप आयुष्याच्या पुस्तकाचा धडा
संचित आपुले वाची, पुण्याचा हा पाढा
नको गंडा डोरा नको , कोणत्याच माळा
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा
आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा II१II
शारदेच्या मंदिराचे गुरूजी पुजारी
विद्येच्या ह्या दरबारी ज्ञानाची शिदोरी
कण कण अनुभूति वेचू करू गोळा,
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा
आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा ॥२॥
माता पिता आणि गुरु , त्रिमूर्ती ही जाणा
तिन्ही हेची टाळ, मृदुंग न वीणा
जगी सर्व सुखी ऐसा एक तोचि मेळा
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा
आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा ॥३॥
तसुभर श्रद्धा परी कष्ट पसाभर
कष्टेविण फळ नाही, कुणा आजवर
जाणुनिया मर्म हेची कर्म सदा पाळा,
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा
आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा ॥४॥
मीच तुझा बाळ तुची, करिशी सांभाळ
तुझ्या संगे जोडू देरे, जीवनाची नाळ ,
तुझ्या पाया पाशी सारा , जन्म साऱ्या वेळा
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा
आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा ॥५॥
गुरु इथे गुरु तिथे , गुरु जळी स्थळी
काष्ट पाषानाही पड़े प्रयत्नांती खरी
ऐसा गुरु चरणाची, धूळ लागो भाळा
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा
आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा ॥६॥
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा || ध्रु ० ||
मायबाप आयुष्याच्या पुस्तकाचा धडा
संचित आपुले वाची, पुण्याचा हा पाढा
नको गंडा डोरा नको , कोणत्याच माळा
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा
आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा II१II
शारदेच्या मंदिराचे गुरूजी पुजारी
विद्येच्या ह्या दरबारी ज्ञानाची शिदोरी
कण कण अनुभूति वेचू करू गोळा,
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा
आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा ॥२॥
माता पिता आणि गुरु , त्रिमूर्ती ही जाणा
तिन्ही हेची टाळ, मृदुंग न वीणा
जगी सर्व सुखी ऐसा एक तोचि मेळा
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा
आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा ॥३॥
तसुभर श्रद्धा परी कष्ट पसाभर
कष्टेविण फळ नाही, कुणा आजवर
जाणुनिया मर्म हेची कर्म सदा पाळा,
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा
आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा ॥४॥
मीच तुझा बाळ तुची, करिशी सांभाळ
तुझ्या संगे जोडू देरे, जीवनाची नाळ ,
तुझ्या पाया पाशी सारा , जन्म साऱ्या वेळा
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा
आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा ॥५॥
गुरु इथे गुरु तिथे , गुरु जळी स्थळी
काष्ट पाषानाही पड़े प्रयत्नांती खरी
ऐसा गुरु चरणाची, धूळ लागो भाळा
आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा
आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा ॥६॥
No comments:
Post a Comment