Amazon

Friday, December 28, 2012

छ.शिवाजी महाराज की जय


हैदराबादच्या एका व्यक्ती सोबत मराठ्यांच्या पराक्रमांवर चर्चा झाली.त्या व्यक्तीने चर्चेदरम्यान एक गोष्ट अशी विचारली की,मराठे लपून हल्ला करायचे का? मैदानातून पळून जायचे का? मराठे लुटारू होते का? तो म्हणाला की आम्ही असे ऐकले आहे की मराठे लपूनछपून यायचे,लपून छपूनच हल्ला करायचे आणि लुटून पळून जायचे,खुल्या मैदानात मराठे यायला घाबरायचे.

मला त्याच्या बोलण्याचा अजिबात राग आला नाही कारण आपल्या देशात ...खो
ट्या इतिहासाच्या प्रसाराने अशा बऱ्याच अंधश्रद्धा मराठ्यांच्या बाबतीत पसरल्या आहेत.त्या व्यक्तीला मी सांगितले की लपून छपून हल्ला करून,अचानकपने आश्चर्याचा धक्का देणे, काही कळायच्या आत शत्रूला संपविणे हा मराठ्यांच्या गनिमी काव्याचा भाग होता.आणि गनिमी कावा हा कमीत कमी सैन्य कामी आणून यश मिळविण्याचा एक मार्ग होता.

कारण प्रत्त्येक सैनिकाचा जीव महत्वाचा वाटायचा आमच्या राजाला. तरी तो व्यक्ती काहीना काही म्हणून मराठे असे होते,मराठे तसे होते असा म्हणायचा.त्यामुळे मी त्याला सरळ त्याच्या हैदाराबाद्चेच उदाहरण दिले.त्याला सांगितले की छ.शिवाजी महाराज नावाचा मराठा आपली अवाढव्य फौज घेऊन हैदराबाद मध्ये आला होता.

ती फौज तुमच्याच गोलकोंडा फोर्टमध्ये तशीच सोडून कोणताही अंगरक्षक सोबत न घेता तुमच्याच राजाच्या घरात भेटीसाठी गेला होता,महिनाभर राहिला आणि अशावेळी तुमचाच राजा घाबरला होता,कारण आपला राजा दिसत नाही म्हणून मराठा फौजेने हैदराबाद संपविण्याची योजना बनविली होती.

तेव्हा घाबरून तुमच्याच राजाने छ.शिवरायांना विनंती केली होती की कृपा करून आपल्या सैन्याला शांत करा.आणि तसे झालेसुद्धा.आपलेछत्रपती दिसले तेव्हा मराठे शांत झाले होते.एवढेच काय तुमच्या राजाचा अवाढव्य,भयावह हत्ती येसाजी कंक नावाच्या मराठ्याने एकट्यानेच संपविला होता आणि सिद्ध केले होते की एक मराठा हत्तीच्या ताकदीचा असतो.उदगिरीच्यालढाईत जी लढाई खुल्या मैदानात झाली होती.

त्याच लढाईत इब्राहीम गार्दी सारखा तोफखान्याचा प्रमुख समोर असतांनासुद्धा थोड्याशा तोफ्खान्यासह मराठेच जिंकले होते.स्वाल्हेरच्या लढाईत खुल्या मैदानात ४०००० मराठ्यांनी ८०००० मुघलांना कसे कापले होते हे तुम्हाला माहिती आहे का?आणि ज्या औरंगजेबाला पूर्ण देश घाबरायचा त्याच औरंग्याला त्याच्याच दरबारात हाणून पडून बोलून, छाती ताणून ,ताठ मानेन निघून जाणारा राजा मराठाच होता.आणि जेव्हा देशातील सर्व शूरवीर शेपूट घालून बसले होते.

तेव्हा घरापासून ८०० कोस दूर खुल्या मैदानात अफगानांना टक्कर द्यायला निघाले आणि जीवाची बाजी लावली ती मराठ्यांनीच............असे म्हटल्यावर तो जरा गप्प राहिला........तरी म्हणाला की लुटायची काय गरज असायची?

मी त्याला म्हणालो की,मराठ्यांनी लुटली ती त्या त्या राजाची संपत्ती,लुटला शत्रूचा आत्मविश्वास आणि अहंकार आणि त्याचा त्या परीसरावरचा अधिकार..मराठ्यांनी कधीही कोण्या शेतकरयला लुटले नाही,कोण्या सामान्य माणसाला त्रास दिला नाही,कधीही कोणत्याही स्त्रीची अब्रू लुटली नाही.................असे म्हटल्यावर त्याला बोलायला मार्ग राहिला नाही..........मित्रांनो तुम्हाला जर कुणी असे विचारले तर तुम्ही सुद्धा हेच उत्तर द्या...........छ.शिवाजी महाराज की जय. .

No comments:

Post a Comment