Amazon

Monday, February 24, 2014

तू नसताना मी

संसाराचा किती वर्ष खेळला त्यांनी सारीपाट
तरीपण दोघांना जाता येत नाही पाठोपाठ
'' तू थांब मागं, मला जावं लागेल पुढं''
दोघेजण दामटत होते आपलं आपलं घोडं.       

देवाच्या हिशोबी दोघांचेही हिशोबच वेगळे
बेरीज, वजाबाकी, गुणाकार करून उरलेल्याला भागलं
ज्याचं गणित बरोबर त्याला अलगद उचललं
खूप विचार केला, वाटलं सारं काही संपलं.

रडलं, भाकलं, ओरडलं, आरडलं नंतर मात्र स्थिरावलं
पुढे गेलेल्याला काय वाटेल? मीच मनाला दटावलं
तेव्हा कुठे माझं मला थोडं फार उमजलं
'तू नसताना मी' आहे, त्यातच सुख मानायचं ठरवलं.


from Loksatta Feb 1st, 2013
http://www.loksatta.com/chaturang-news/i-without-you-361099/3/




No comments:

Post a Comment