Amazon

Monday, February 17, 2014

अपुले आभाळ अपुले तारे

अपुले आभाळ अपुले तारे,
आपले आपण सारे शोधावे,
हिरव्या पानामधे लपलेले,
आपले नशीब वाचावे .

पाउले नेतील जिथे जिथे
वाटा त्या आपुल्या होती
घामाचे थेंब रुजुनी जेंव्हा
बोलावे हक्काची माती

डोळ्यात आपल्या आपण थोड़ी,
सोनेरी स्वप्ने ही पेरत जावे,
हिरव्या पानामधे लपलेले,
आपले नशीब वाचावे .

फुलांच्या  गावात लागती,
चांदण्या नजरेचे दिवे,
गोळा करावे गवतामधूनी,
फुलपाखरांचे थवे.

उडनी जाती सारी पाखरे,
कुणीतरी हसावे,
हिरव्या पानामधे लपलेले,
आपले नशीब वाचावे.

---मन्या ( मराठी चित्रपट )

No comments:

Post a Comment