Amazon

Monday, June 29, 2015

बाळकृष्ण हरी कोल्हटकर

(बाळ कोल्हटकर आणि वसंतराव देशपांडे)

महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू. बाळ कोल्हटकरांचा जन्म २५ सप्टेंबर रोजी सातारा येथे झाला. शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी "जोहार" हे आपले पहिले नाटक लिहिले. 

१९४७ पर्यंत त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी केली. त्यानंतर लेखनासाठी आणि रंगभूमीसाठी त्यांनी आपले पुढील आयुष्य वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. ज्यांना पुर्वी लोक हसायचे आणि टिंगल करायचे असे बाळ कोल्हटकर प्रेकक्षांची नस नेमकी ओळखत असत. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत.

त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. बर्‍याच नाटकांचे हजाराच्या वर प्रयोग झाले. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती. "दुरितांचे तिमिर जावो" या नाटकांचे पंधराशे प्रयोग, 'वाहतो ही दुर्वाची जुडी' या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे' याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर 'एखाद्यांचे नशीब' या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. यावरुन नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते. 

बाळ कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर विभागात १९५९ ते १९७२ या काळात वास्तव्यास होते. त्यांनी खेर विभागातील प्रसिद्ध हेरंब मंदिरात 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'वेगळं व्हायचंय मला', अशी काही प्रसिद्ध नाटकं लिहिली तसेच सीमेवरुन परत जा, लहानपणा देगा देवा, देव दीनाघरी घावला, देणार्‍याचे हात हजार, उघडलं स्वर्गाचे दार, इत्यादी त्यांची गाजलेली नाटके. त्यांनी एकंदर ३० हून अधिक नाटके लिहिली. 

सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली. प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली. 

नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. अशा या ज्येष्ठ नाटककाराचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.

अंबरनाथ वासीयांचे कोल्हटकरांवर त्यांच्या कविता आणि नाटकांवर विशेष प्रेम याच प्रेमापोटी अंबरनाथमध्ये २००९ - १० च्या दरम्यान बाळ कोल्हटकर ज्येष्ठ नागरिक कट्टा तयार करण्यात आला. खेर विभागातील कोल्हटकरांचा 'भूषण' हा बंगला आजही त्यांची आठवण अंबरनाथकरांना करून देतो.

Wednesday, June 24, 2015

मेणवली घाट , वाई -सातारा

 मेणवली घाट , वाई -सातारा

आपण हा घाट अनेक हिंदी चित्रपटांमधे पाहिला असेलच ,
उत्तरप्रदेश,बिहार मधील गावांची नावे वापरली जातात
पण शुटींग मात्र इथेच (आपल्या साताऱ्यात) होत असते
वाईपासून तीन किलोमीटर अंतरावर मेणवली गाव आहे.
या गावाला पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धी मिळाली
ती नाना फडणवीसांनी कृष्णा नदीच्या काठावर बांधलेल्या
भव्य वाड्यामुळे आणि काठावरील मंदिरांमुळे.
फडणवीसांनी मेणवलीत वाडा, अमृतेश्वर मंदिर, विष्णू-लक्ष्मी
(मेणवलेश्वर) मंदिर आणि कृष्णानदीवर घाट बांधला.
नानांचा वाडा गढीवजा असून मराठी वास्तुशैलीचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे.
वाड्याला बाजूने उंच तटबंदी केलेली आहे. नक्षीकाम केलेली पाण्याची कुंडेही पाहावयास मिळतात.
या ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाड्यात असणाऱ्या
जवळजवळ सर्वच खोल्यांमध्ये वेगवेगळ्या पौराणिक कथांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत.
इसवीसन १७७० ते १८०० या दरम्यान काढलेली ही चित्रे आवर्जून पाहण्यासारखी आहेत.
या सर्वांपेक्षा वेगळे चित्र लक्ष वेधून घेते ते म्हणजे मस्तानीला समोर बसवून काढलेले तिचे चित्र.
सातारा ते मेणवली अंतर ३६ किलोमीटर आहे.
वाईपासून पुढे मेणवलीला जाता येते.
या गावाच्या घाटावरील प्रचंड घंटा हेही एक आकर्षणकेंद्र असून,
वाईप्रमाणेच याही गावाला चित्रीकरणासाठी पसंती दिली जाते.
अभिमान वाटला पाहिजे इतकी सुंदर निसर्ग
आणि तितक्याच तोडीची पर्यटन स्थळे आपल्या महाराष्ट्रात आहेत

Thursday, June 11, 2015

आनंदलोक - कुसुमाग्रज

माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही


माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर


सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा होऊन.