(बाळ कोल्हटकर आणि वसंतराव देशपांडे)
महाराष्ट्राचे लाडके
नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी तथा बाळ
कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू. बाळ कोल्हटकरांचा जन्म २५
सप्टेंबर रोजी सातारा येथे झाला. शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले.
लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती. त्यामुळे
लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी
त्यांनी "जोहार" हे आपले पहिले नाटक लिहिले.
१९४७
पर्यंत त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी केली. त्यानंतर लेखनासाठी आणि
रंगभूमीसाठी त्यांनी आपले पुढील आयुष्य वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली
नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. ज्यांना पुर्वी लोक हसायचे आणि
टिंगल करायचे असे बाळ कोल्हटकर प्रेकक्षांची नस नेमकी ओळखत असत. त्यांच्या
नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य
प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत.
त्यांची
बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. बर्याच नाटकांचे हजाराच्या वर प्रयोग
झाले. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक
नाटकातून काही मूल्य जपली होती. "दुरितांचे तिमिर जावो" या नाटकांचे
पंधराशे प्रयोग, 'वाहतो ही दुर्वाची जुडी' या नाटकाचे चौदाशे प्रयोग,
मुंबईची माणसे' याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर 'एखाद्यांचे नशीब' या
नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. यावरुन नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर
किती प्रेम केले याची साक्षच पटते.
बाळ
कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर विभागात १९५९ ते १९७२ या काळात वास्तव्यास
होते. त्यांनी खेर विभागातील प्रसिद्ध हेरंब मंदिरात 'वाहतो ही दुर्वांची
जुडी', 'वेगळं व्हायचंय मला', अशी काही प्रसिद्ध नाटकं लिहिली तसेच
सीमेवरुन परत जा, लहानपणा देगा देवा, देव दीनाघरी घावला, देणार्याचे हात
हजार, उघडलं स्वर्गाचे दार, इत्यादी त्यांची गाजलेली नाटके. त्यांनी एकंदर
३० हून अधिक नाटके लिहिली.
सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली. प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली.
नाटककारांच्या
बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय
गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे
आणि नटाचे मोठेपण आहे. अशा या ज्येष्ठ नाटककाराचे ३० जून १९९४ रोजी निधन
झाले.
अंबरनाथ
वासीयांचे कोल्हटकरांवर त्यांच्या कविता आणि नाटकांवर विशेष प्रेम याच
प्रेमापोटी अंबरनाथमध्ये २००९ - १० च्या दरम्यान बाळ कोल्हटकर ज्येष्ठ
नागरिक कट्टा तयार करण्यात आला. खेर विभागातील कोल्हटकरांचा 'भूषण' हा
बंगला आजही त्यांची आठवण अंबरनाथकरांना करून देतो.
No comments:
Post a Comment