Amazon

Wednesday, February 25, 2015

ऋतू येतील जातील

ऋतू येतील जातील
आणि आयुष्य सरेल
फक्त संचिताचे सार
पुढे श्वासात उरेल

असे मन माझे
ओढ़ते मला की
आभाळाचा जीव
मातीशी जडावा

जसा उगवतो सूर्य
अंधार फोडून
तसा सूर्य माझा
गगनी भिरावा

असे झाड़ लाभो
माझ्या या गाण्याला
जिथुन आभाळी
गरुड़ उड़ावा

चित्रपट :- सुम्बरान

No comments:

Post a Comment