Amazon

Tuesday, December 23, 2014

साने गुरुजी

पांडुरंग सदाशिव साने
साने गुरुजी
टोपणनाव: साने गुरुजी
जन्म: डिसेंबर २४, इ.स. १८९९
पालगड, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: जून ११, इ.स. १९५०
के.ई.एम.रुग्णालय मुंबई
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: राष्ट्र सेवा दल
पत्रकारिता/ लेखन: छात्रालय दैनिक, साधना, साप्ताहिक
प्रमुख स्मारके: वाडघर-गोरेगाव, माणगाव तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
धर्म: हिंदू
प्रभाव: महात्मा गांधी
वडील: सदाशिव

आई: यशोदाबाई
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. 'श्यामची आई', 'नवा प्रयोग', 'सुंदर पत्रे', 'हिमालयाची शिखरे', 'क्रांती', 'समाजधर्म', 'आपण सारे भाऊ' इत्यादी त्यांचे विपूल साहित्य प्रसिद्ध आहे.
अनुक्रमणिका [लपवा]
१ जीवन
२ आंतरभारती
३ माणगावचे आणि पुण्याचे सानेगुरुजी स्मारक
४ आंतरभारती साहित्य संवाद संमेलन
५ साहित्य
६ साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य
७ चरित्रे
८ बाह्य दुवे
जीवन[संपादन]
साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

साने गुरुजी यांच्या हस्ताक्षरातील एक कविता
बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनी राहो।।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।।
—साने गुरुजीकृत काव्यपंक्ती
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित 'गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे 'दु:खी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा इतिहास' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्‍त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील अनेक थोर व्यक्तित्वे घडविली. उदा. - एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मधु दंडवते, ग. प्र. प्रधान, प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र. द. पुराणिक, वा. रा. सोनार, सी. एन. वाणी, शांतीलाल पटणी, यदुनाथ थत्ते, राजा मंगळवेढेकर, रा. ग. जाधव, दादा गुजर इ.
आंतरभारती[संपादन]
१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषातज्ज्ञांशी त्यांच्या संबंध आला होता. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली.
प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ ठाकूर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती[ संदर्भ हवा ]. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यानी आत्महत्या केली.
माणगावचे आणि पुण्याचे सानेगुरुजी स्मारक[संपादन]
साने गुरुजींच्या स्मरणार्थ 'सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमेट्री आणि कॅम्पिंग साइट बांधण्यात आल्या होत्या. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमेट्रीची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, मित्रमेळावा, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.
या संस्थेने आता (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले आहे. या दुसऱ्या टप्प्यात 'सानेगुरुजी भवन' आणि 'आंतरभारती अनुवाद केंद' अशा दोन प्रकल्पांची योजना आखली आहे. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन 'सानेगुरुजी भवना'मध्ये होणार आहे. सानेगुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच 'आंतरभारती अनुवाद केंद्र' हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद काँप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. सानेगुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.
पुण्यातही साने गुरुजींचे स्मारक आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयांवरील नाटकांच्या सादरीकरणासाठी या स्मारकाजवळ बॅ.नाथ पै रंगमंच या छोट्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे.
आंतरभारती साहित्य संवाद संमेलन[संपादन]
२०१२ सालचे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन माणगावला याच संस्थेत झाले. आधीची संमेलने मुंबईत झाली होती.
साहित्य[संपादन]
गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके आहेत. वरदा प्रकाशनाने ती ३६ खंडांत पुन:प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.
साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]
साने गुरुजी यांचे हस्ताक्षर
अमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते)
आपण सारे भाऊ भाऊ
आस्तिक
इस्लामी संस्कृति
कर्तव्याची हाक
कला आणि इतर निबंध
कला म्हणजे काय?
कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
क्रांति
गीताहृदय
गुरुजींच्या गोष्टी
गोड गोष्टी (कथामाला), भाग १ ते १०
भाग १ - खरा मित्र
भाग २ - घामाची फुले
भाग ३ - मनूबाबा
भाग ४ - फुलाचा प्रयोग
भाग ५ - दुःखी
भाग ६ - सोराब आणि रुस्तुम
भाग ७ - बेबी सरोजा
भाग ८ - करुणादेवी
भाग ९ - यती की पती
भाग १० - चित्रा नि चारू
गोड निबंध भाग १, २
गोड शेवट
गोष्टीरूप विनोबाजी
जीवनप्रकाश
तीन मुले
ते आपले घर
त्रिवेणी
दिल्ली डायरी
देशबंधु दास
धडपडणारी मुले
नवा प्रयोग
पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर
पत्री
भगवान श्रीकृष्ण व इतर चरित्रे
भारतीय संस्कृती (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत)
मानवजातीचा इतिहास
मोरी गाय
मृगाजिन
रामाचा शेला
राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद)
विनोबाजी भावे
विश्राम
श्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)
श्यामची आई
श्यामची पत्रे
सती
संध्या
समाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)
साधना (साप्ताहिक)(संस्थापक, संपादक)
सुंदर पत्रे
सोनसाखळी व इतर कथा
सोन्या मारुती
स्त्री जीवन
स्वप्न आणि सत्य
स्वर्गातील माळ
हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
चरित्रे[संपादन]
साने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-
आपले साने गुरुजी . लेखक डॉ. विश्वास पाटील
जीवनयोगी साने गुरुजी. लेखक डॉ. रामचंद्र देखणे
निवडक साने गुरुजी. लेखक रा.ग. जाधव
महाराष्ट्राची आई साने गुरुजी. लेख्क वि.दा. पिंपळे
साने गुरुजी. लेखक यदुनाथ थत्ते, रामेश्वर दयाल दुबे.
साने गुरुजी आणि पंढरपूर मंदिरप्रवेश चळवळीचे अध्यात्म. लेखक आत्माराम वाळिंजकर
साने गुरुजी गौरव ग्रंथ. लेखक रा.तु. भगत
साने गुरुजी जीवन परिचय. लेखक यदुनाथ थत्ते
साने गुरुजी - जीवन, साहित्य आणि विचार. लेखक ?
साने गुरुजी पुनर्मूल्यांकन. भालचंद्र नेमाडे
साने गुरुजी यांची सुविचार संपदा. लेखक वि.गो. दुर्गे
साने गुरुजी साहित्य संकलन. लेखक प्रेम सिंह
सेनानी साने गुरुजी. लेखक राजा मंगळवेढेकर

Monday, December 22, 2014

मानवतेचा अभय साधक

सामान्यत्वातून साधक होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नाही. यासाठी कुठल्याही साधकाच्या अंगी साधना असावी लागते अन् या साधनेसाठी आवश्यक असते कठोर उपासना. या दोन्हीचा आधार लाभला, की मग साधकाची वाटचाल सुरू होते नवसर्जनाच्या दिशेने. या संपूर्ण प्रवासात काय गमवायचे आहे आणि काही कमवायचे आहे, ही भावनाच गळून पडते अन् एका विशिष्ट निर्धाराने निघालेल्या या साधकाला एक अशी स्थिती प्राप्त होते, जेथे त्याला बघून इतरांचे हात जुळतात, हृदये एक होतात, लाखो स्वप्नधुंद ज्वालांचे हितगुज तेथे चालते अन् अतिथी म्हणून आलेला प्रत्येक आनंदी किरण तेथील रहिवासीच होऊन जातो. मानवतेचा अभय साधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या बाबा आमटेंचे वर्णन याहून वेगळे ते काय करता येईल. 
सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, १ आजारी गाय व सरकारकडून मिळालेली ५0 एकर नापीक जमीन या एवढय़ा ‘मालमत्ते’च्या बळावर कुष्ठरुग्णाच्या अंगावरील दृश्य स्वरूपातील व समाजाला लागलेल्या अदृश्य स्वरूपातील आजारावर उपचार शोधण्यासाठी निघालेला हा अवलिया खरंच या शतकातला रिअल हीरो. आज बाबा आमटेंचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असताना त्यांच्या कर्तृत्वाने उजळलेल्या साहसकथा या नव्या पिढीलाही कळल्या पाहिजेत.
बाबांना एक नवा, निरोगी व सशक्त समाज घडवायचा होता व त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायची तयारी होती; परंतु बाबा या विचारापर्यंत कसे पोहोचले, हे जाणून घ्यायचे असेल, तर आधी त्यांच्या बालपणात डोकवावे लागेल. 
मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. बाबांनी नागपूर विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेऊन १९३४मध्ये बी. ए. व १९३६मध्ये एल. एल. बी. ही पदवी संपादन केली. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी, असे बाबांचे विचार होते; परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली; पण असाध्य गोष्टींना स्वत:हून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे या विलासी आयुष्यात मन काही लागत नव्हते. अखेर मनाचा निर्णय पक्का झाला व एक दिवस मोहाचे हे सर्व पाश तोडून त्यांनी थेट गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाची वाट धरली. यापुढचे आयुष्य कोणत्या दिशेने जाईल, याचा काहीच थांग लागत नसताना एका पावसाळी संध्याकाळी अचानक त्यांना त्यांच्या जीवनाची दिशा गवसली.  बाबा कुठून तरी परतत असताना एका गटाराशेजारी कुष्ठरोगाने पीडित असलेलं एक जणू जिवंत प्रेतच बाबांना दिसलं आणि अनामिक भीतीने ते चक्क पळून जायला लागले; परंतु काही वेळ प्रचंड अस्वस्थतेत घालविल्यानंतर माघारी फिरले अन् त्या कुष्ठरोग्याला उचलून घरी आणून त्याची जमेल तशी सेवा केली. हीच घटना बाबांच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. पुढे त्या कुष्ठरुग्णाचा मृत्यू झाला; पण या मृत्यूनेच जणू बाबांच्या आयुष्यात एक चैतन्याचं गुपित उलगडल.ं. जिथे भीती आहे, तिथे प्रीती नाही; जिथे प्रीती नाही, तिथे परमेश्‍वर असूच शकत नाही, या निष्कर्षाप्रत बाबा पोहोचले व त्यांनी यापुढचे संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी झोकून द्यायचे ठरवले. 
जीवनात कुठलीच आशा शिल्लक नसलेल्या कुष्ठरोग्यांसमवेत बाबांनी अर्मयाद श्रमांतून पडीक माळरानावर ‘आनंदवन’ फुलवले तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. हे चित्र तर बाबांच्या प्रयत्नांनी बदलायला लागले होते; परंतु अवघ्या समाजाला कवेत घेऊ पाहणारा वर्ण व वर्गातील दुजाभाव, श्रीमंत व गरिबांत विस्तारणारी दरी त्यांना अस्वस्थ करीत होती. या सामाजिक आजाराचाही बंदोबस्त करावाच लागेल, असा एक नवा निर्धार बाबांनी केला व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी १९८५मध्ये ‘भारत जोडो’ अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. या अभियानाच्या निमित्ताने त्यांनी भारतभ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवले आहे.
नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल १२ वर्षे नर्मदेकाठी मुक्काम करून बाबांनी या आंदोलनाला सामाजिक चळवळीचे रूप प्राप्त करून दिले. ‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’ या कवितेच्या ओळींना वास्तवात उतरवत केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे, तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळा उभारल्या. कुष्ठरोग्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ व अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती व त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदी कुटीरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर), सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्रे स्थापन केली.  बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर मोठे साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते, इतके त्यांचे साहित्य दज्रेदार आहे. सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले असतानाही त्यांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्‍जवल उद्यासाठी’ हे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते. मनस्वी संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती या बळावर बाबांनी देशाच्या सामाजिक इतिहासात आपला एक वेगळा ठसा उमटवला.  
९ फेब्रुवारी  २00८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने बाबांचा हा दिव्य प्रवास लौकिकार्थाने थांबला असला, तरी कृतीतून मात्र तो अजूनही सुरूच आहे. आज बाबांच्या पुढच्या पिढीतील (डॉ. प्रकाश आमटे, विकास आमटे व त्यांचे कुटुंबीय) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून बाबांनी शिकवलेल्या निष्ठेनेच समाजकार्याचा हा वसा सांभाळत आहेत. बाबा आपल्या कवितेतून म्हणायचे..
‘मला ठाऊक आहे,
हे सामान्य माणसाचे शतक आहे.
न्यायोचित माणसाला, अन्याय्य व्यवस्थेत
जागा एकच : तुरुंग किंवा मृत्यू
तुरुंगाबद्दल मला प्रेम आहे
आणि मृत्यूचे मला भय नाही.’
जीवनाचे सार्थक करणारे असे साधे व सोपे तत्त्वज्ञान सांगणार्‍या बाबा आमटे नावाच्या मानवतेच्या अभय साधकाने दाखवलेल्या या विधायक मार्गावर आपला समाज दोन पावले जरी पुढे चालला, तर हीच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपानिमित्त बाबांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
 

Thursday, December 18, 2014

A Thanksgiving Day for me...

                   Thanks to all for your wishes, because of you ppl only my day become priceless and memorable.Mostly I don't like to cut the cake and celibate it, for me its just date, But I am speechless what you ppl did on my birthday, I got to know that I have too much close one who cares for me and wants to do anything to make me happy.
                   One thing I want to mention here, same day 17th DEc is also a birthday of Bollywood actor " Riteish Deshmukh " ( Belated Happy birthday Riteish sir ) let see if I get a girl like Genelia ( just kidding )
                   First thing thanks to all my friends who are in whatsApp group, yesterday you ppl changed the group name with " Pramod Birthday Festival" and some other similar group name, I was confused for which group I had written thank you and for which I didn't.
                   One more funny thing is, one of my friend posted on whats app group, first he sent Chivas Regal( blended Scotch whisky) image to wish me, and later he thought that I don't drink so then he sent "coca cola, Fanta,Sprite " , I was laughing like anything. because these are my favorite brands which I mostly take to give company to you ppl. Thank you Anand Sir.
                  One more funny thing happen like one of friend posted contradictory or something different or may be true description of mine on fb, I was like " aaannnnh??" see what he wrote
"आपल्या ग्रुपचे सन्माननीय सदस्ये, खोचक, सडपातळ बांधा प्राप्त, कातिल स्माईल प्राप्त, निगर्वी, लोभस, कन्याकर्शी व्यक्तिमत्व 143, 143 प.पू हभप श्री श्री श्री पमु दादा डमरे यांना प्रकट दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एक रौप्य महोत्सव यशस्वी पने पार पाडल्याबद्दल जाहिर सत्कार इथूनच. अनेक शुभेच्छा दोस्ता खुप मोठा हो दोस्ता.
विशेष टीप- वाढदिवस सतरा बाराला आहे याची इस्पेशली नोंद घ्यावी. आपल्याला पटेल त्या हॉटेलात जाउन बिलाची पावती त्यांना वाटस अप करावी" According to this, he should have factory of producing words or any Android application . Thank you Nilesh for this. And thank you Sachin for the book " How Sachin destroyed my life by Vikram sathaye" I was thinking to order this but thank god I didn't order.
                Most funny thing happens when I was returning from Deccan after celebration with my school friends, One of IBM friend call me and asked me to come to Margaretta, as they want give me surprise but that time I was at Deccan, so their surprise plan become non surprise, so they just told me like we are waiting just come to Margaretta, while returning from Deccan I was carrying my gifts and flowers and I was look like I just returned from any function or going to celibate any other function.
Some friends are not on fb otherwise I would have tag him here,soThank you to,
School friends ( from my Village ),
12th friends ( Dr. Chandrabhanu Sonvane Junior collage latur classmates)
SGGS frineds, Specially Sukhmani group, ( our fav tagline : जगात जर्मनी, भारतात परभणी आणि विश्नुपुरीत सुखमणी ) ,
IT batch group,
Shivgaurav group,
Cricket group ( as I am x -Coach( water boy/12th guy) of our Winner of IT team).
IBM group ( BOA and training batch mates) and new Pune John Deere Team.
and all FB friends.
Thanks to all making my birthday special.