Amazon

Saturday, December 24, 2016

वसंतऋतू आणि मी

हाच तो इयत्ता दुसरी मधला बालभारतीचा शेवटचा धडा,

जिथून मला वसंत ऋतूची ओळख झाली, त्यावेळी समजलं नव्हता कि यामध्ये वसंत ऋतूच वर्णन आहे, माहित नाही का? पण या मधल्या ओळी मी कधीच विसरू शकलो नव्हतो  त्या म्हणजे नवीन फुटलेली पालवी,  खडकावर उमलणारा पांढरा चाफा, अगदी दुसरी इयत्ता संपली तरी मी खडका वर उमलणारा पांढरा चाफा शोधत राहायचो, सापडला कुठेतरी, नक्की कुठे ? ते आठवत नाही. पण पांढरा चाफा शोधता शोधता लाल पळस खूप सापडले, तसे आमच्या शेताकडे खूप होते, खरंच ह्या धड्यात सांगितल्याप्रमाणे ऐन वसंतात कडक उनात लाल भडक पळस उमलेला दिसायचा, झाड जवळ गेलो कि असंख्य मधमाश्या दिसायच्या मग एक फाटा तोडायचो, अगदी विकत आणलेल्या गुच्छा सारखा दिसायचा.  कोणाला द्यावा बर गुच्छ हा ? कोणी नव्हते म्ह्णून मी तो सायकलच्या हॅन्डल अडकवून शेतातून घरी यायचो .. मस्त स्वच्छंदी शेतात फिरून.

ह्या धड्यातल्या अजून खूप गोष्टी मी विसरलो नव्हतो, रस्त्यावर येऊन थंडगार धुळीत सापांना बरे वाटते असं वर्णन होत .. तेंव्हा सकाळी शेतात जाताना मी सापाच्या खुणा शोधायचो, शोधायचो म्हणजे खूप कष्ट वगैरे घेत नव्हतो फक्त जाताना मातीचे ठसे पाहायचो. जस जस वय वाढत गेलं तश्या तश्या गोष्टींचा उलगडा होत गेला आणि मग वसंत ऋतू म्हणजे माझ्यासाठी स्वच्छंदी फिरण्यासाठी दरवर्षीची पर्वणीच झाली!

तस मी अनेक कविता शोधायचो इंटरनेट वर पण हा धडा सापडला आणि माझ्या आनंदाला पारावर उरला नाही !  पहा तुमच्या पण काही आठवणी आहेत का यांसारख्या ?


No comments:

Post a Comment