Amazon

Sunday, July 26, 2015

मराठी नाटक……………………दोन स्पेशल

खुप दिवसापासूनची इच्छा होती "दोन स्पेशल" नाटक पहायची ती आज पूर्ण झाली. खर तर नाट्यगृहामधे जाऊन पहिलेलं आतापर्यंतच हे माझं तिसरच नाटक, तशी नाटकाची उत्सुकता होतीच, पण इतरांकडून ऐकलेलं समालोचन आणि नाटकाबद्दलच मत ऐकून ती अजूनच वाढली। तस प्रसाद सर ( प्रसाद ओक ) म्हटल्याप्रमाणे बाहुबली चित्रपटा इतकेच हे नाटक कौतुकास्पद आहे. एक अविस्मरणीय वीकेंड बनून जातो. कथा ही १९८९ च्या हिन्दुस्तान दैनिक पत्रकाराची, पत्रकारितेची आणि मिलिंद भागवत ( जितु दादा ) याच्या तत्वाची, कथानक खूपच गुंतवून ठेवनारे आहे, संवादाबद्दल तर बोलायचे म्हटले तर दररोजचे चित्रपटांचे बर्गर खाऊन कंटाळा आल्यावर अचानक कोणीतरी पंच पक्वान्नाच आमंत्रण द्याव तसे आहेत.

नाटक पाहत असताना ते आपल्याला त्या काळात नेऊन ठेवते ज्यावेळी बॉलपेनचा नुकताच शोध लागलेला असतो, ते वाजणारे जुने फोन वगैरे. सहअभिनेता पण खूपच भाव खाऊन जातो अगदी शेवटच्या संवादा पर्यंत. पहिल्या अंकापर्यंत लवस्टोरी मधे मिलिंद भागवत ( जितेंद्र जोशी ) बद्दल जास्त आपुलकी वाटते पण दुसऱ्या अंकात सर्व काही उलगडत जाते.

मला आवडलेले काही संवाद,
संवाद १.  ( स्वप्ना  हिन्दुस्तान दैनिक हातात घेतल्यावर )
स्वप्ना ( गिरिजा ओक ) : अरे तू शब्द कोडी पण बनवतोस?
मिलिंद ( जितु दादा ) : काही लोक प्रेमाभंग झाल्यावर कविता करतात अन मी शब्दकोडी बनवतो.

संवाद  २. ( स्वप्ना जूना पेन पाहताना )
स्वप्ना ( गिरिजा ओक ) : अरे हा पेन तू अजुन जपून ठेवलास ?
मिलिंद ( जितु दादा ) : आपल्या प्रेमपेक्षा हां पेनच जास्त टिकला.

मला आवडलेल वाक्य
 " आपल्या जवळच्या माणसाला आपले दुःख सांगितले की आपले मन हलके होते पण त्याची काळजी वाढत जाते. "

नाटकाचा शेवटचा संवाद तर तिकीटाचे पैसे वसूल करणारा आहे, तो मी इथे सांगत नाही तो तुम्ही नाट्यगृहात जाऊनच पहा.

नाटक संपल्यावर जितुदादा सोबत मी,

1 comment:

  1. आपण ज्या माणसाला भुतकाळात सोडून दिलंय त्याच्या हातात आपलं भविष्य असणं यासारखी घाबरवणारी दुसरी गोष्ट नाही !!!!

    Best dialogue by Girija...

    ReplyDelete