Amazon

Saturday, June 21, 2014

चार ओळी

ह्या जगाच्या गर्दी मधे
मी एकटा कधीच नव्हतो
गप्पा गोष्ठी तर भरपूर  व्हायच्या
पण त्यामधे मी कुठेच नव्हतो
----------------on 04-06-2014

जेंव्हा ऐनवेळी संकट येतात
तेंव्हा सर्वजण पाठ फिरवतात
संकटावर मात तर होतेच पण दुक्ख याच आहे की,
सोबत असलेले हात मात्र हरवतात
 ----------------on 04-06-2014

उपदेश घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांचीच संख्या वाढली
जिथे स्वतःच्याच घरी अंधार,
तिथे दुसऱ्याच्या अंगणात दिवा लावणार कसा ?
आणि ज्याला अंधाराचीच  आवड आहे त्यांच्या घरी, सूर्य जरी  आणला तरी काय उपयोग ?
----------------on 04-06-2014

अंतरी  मनापेक्षा मुखवट्यालाच
जास्त मागणी आहे.
पण ते विसरतात,
मुखवटा बनवणारा कोणी तिसराच आहे
 ----------------on 04-06-2014

No comments:

Post a Comment