Amazon

Tuesday, June 25, 2013

विखी वूखू वेक्खे.............full of laugh





संपूर्ण संवाद :
धनाजी रामचंद्र वाकडे आयला वाकड्यात शिराव लागणार वाटतंय
जवळकर: माळी...... मालक कुठंय ......
वाकडे: मीच मालक आपण कोण ....
जवळकर: मी.... मला ओळखल नाही.... अजब आहे हा हा हा
ती बाहेर उभी आहे ती मरसडीज गाडी कुनाचीये....
वाकडे: नाय माझी नाय...
जवळकर: तुमची नाय... माझिये ...
दिल्ली, कलकत्ता, मद्रास, बेंगलोर तिथे मोठमोठी पंचतारांकित
हॉटेल्स आहेत कुणाची आहेत माहितीये ....
वाकडे: नाय माझी नाय...
जवळकर: तुमची नाय... मग माझी असतील बहुतेक...
इंटरन्याशनल कनस्ट्रक्शन कंपनी कोणाचिये...
वाकडे: कुनाचीका आसना आपल्याला काय करायचं...
जवळकर: हाड त्याचा आयला... ए माझीये ...
दार्जीलिंग डायमंड हिऱ्यांचा व्यापार करणारी सर्वात मोठी कंपनी कुनाचीये
वाकडे: अर्थात हिऱ्यांची...
जवळकर: (विखी वूखू) माझीये ...
तसा मी दानवीर, कर्मवीर, धर्मवीर आणि बरेच काही वीर
उद्योग भूषण यदुनाथ जवळकर
जरा लांब उभे राहा... लांब उभे..... राहा लांब उभे राहा...
वाकडे: जवळकर म्हणजे तुम्ही आमचा महेश जवळकर....
जवळकर: बाप आहे त्याचा....

"धूमधडाका" हा मराठी मधला अशक्य विनोदी चित्रपट आहे. ज्यांनी हा चित्रपट बघितला नाही अशा लोकांचं आयुष्य फुकट आहे. आजही या चित्रपटामधल्या प्रत्येक डायलोग पाठ असणारे बरीच लोक आहेत

Monday, June 24, 2013

थोडे प्रदीर्घ.... पण फार महत्वाचे

थोडे प्रदीर्घ.... पण फार महत्वाचे
********************
प्रिया मित्रानो, लग्न होणार
असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख
वाचवा आणि आणि कुठेतरी सांभाळून सेव्ह
करून ठेवा परत वाचण्यासाठी.....: 'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट
असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम
नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने
'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून'
असणंही मस्ट असतं. पण,
तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा,
तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे
मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं,
नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन
कसा असावा... - उद्या कदाचित तुझं
नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल,
त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.
- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल,
तुझ्याएवढाच पगार कमावत असेल.
- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील,
आवडी असतील,
- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल
टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच
किंवा तुझ्या बहिणीसारखं..
- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न
देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे
जाण्यासाठी धडपडत असेल,
अगदी तुझ्यासारखीच!
- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं
आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात
घालवली असतील,
- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर,
प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं
कुटुंब,
तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल. - पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे
स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल
- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले
असताना ती मात्र
सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी,
अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.
- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात
द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं
असावं अशी अपेक्षा असेल,
- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन
पाळताना उशीर होत असेल, - तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित
तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने
तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल.
- नोकर, स्वयंपाकी, बायको,
यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून
काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील...
- तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये
आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये
या अपेक्षाही तिला माहिती असतात.
- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात
मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही तरीही ईर्ष्या, अनावश्यक
स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने
तुमच्या मनात घर करू नये म्हणून
ती बालमित्रांपासूनही दूर राहते.
- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला,
धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं
नसतानाही ती तसं करत नाही. मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ
आपण एकच तिच्या ओळखीचा,
जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत,
संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे
अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं
अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...
एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं
सुंदर करेल, तुम्ही मदत केली आणि विश्वास
ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक
यशस्वी शिखर गाठू शकेल..
(By : Darshan Musale jee & Vijay Devikar)

Friday, June 14, 2013

ओल्या ओल्या दिशा

ओल्या ओल्या दिशा, पावसाळले आभाळ
चिंब चिंब ओली ओली रम्य सायंकाळ
कोवळे कौळे ऊन ऊन रेंगाळत आले
हिरवे हिरवे पानंपान सोनेरी झाले

पातन् पात गवताची चैतन्याने सजली
माळ रान डोंगर दरी आनंदाने भरली
ओढ्याच्या ओघातला घनगंभीर निनाद
धवलशुभ्र उसळलेला स्वच्छंदी आल्हाद 

उधळलेल्या थेंबांचा वार्‍यातला प्रवास
लुसलुसीत हिरवाळीचा गवतपाती वास
तुषारांच्या अंगकांती चिकटलेले सोने
प्रपाती कल्लोळाने भारावलेली मने 

काळ्याकुट्ट कातळाचे पाझरते हृदय
जगा सांगे जीवनाचा आनंदी आशय
गडगडणारे काळे ढग जरी दाटले नभी
कडेकपारी रानकेळी अंग झोकुन उभी ! 

वठलेल्या फांदीवरती शेवाळी चादर
नव जीवन जणू करते वार्धक्याचा आदर !
नाजुकनार वेलींना आभाळाचा ध्यास
फांदी फांदी डहाळीतून त्यांचा प्रवास 

लुसलुशीत वेली घेती कमनीय हिंदोळा
पारदर्शी तुकतुकीत रंग हिरवा कोवळा
ऊन ऊन धाग्यातुन थेंब थेंब ओवलेले
वार्‍याचे अंतरंग सोन पिवळे झालेले 

पानांच्या कांतीवर पिवळी पिवळी कल्हई
धबाबाच्या फेसावर सोन्याची नवलाई
इवल्या इवल्या थेंबांवर उतरले ऊन
सप्तरंगी इंद्रधनुष्य आले साकारुन 

सात रंगी कमानीची टोके डोंगरात
हिरव्या निळसर ऊंच ऊंच झाडाझुडपात
आकाशी कागदावर थेंब थेंब रंगारी
मावळतीच्या ऊन्हातुन सप्तरंग चितारी 

काळ्या ढगाला रेललेली ऊन्हाची शिडी
दिव्यतेची दिमाखदार दैदिप्यमान उडी
ओघळत्या सुवर्णाची पाहून पागोळी
मनातल्या कुबेराची अळी मिळी गुपचिळी ! 

आश्चर्याने आ वासुन रंग रंग टिपावे
निसर्गाचे अंतरंग स्तब्धतेने पहावे
हिरव्या हिरव्या रंगांच्या किती किती छटा
झाड, झुडुप, गवत, पान, वेलींच्या बटा 

वाट संपल्या वेलींचा खुंटला प्रवास
ऊन ऊन धाग्यांवर चढायचा प्रयास
पावसाच्या चादरीवरती वार्‍याची उडी
नवीन तलम कापडाची विस्कटलेली घडी 

काळ्या काळ्या ढगाच्या थेंब थेंब हृदयात
ऊन स्पर्श फुलवतो चैतन्याची रुजवात
गवतमाथी सांडलेले ऊन्हाचे शिंपण
भिरभिरत्या चतुरांचे तयावरती रिंगण 

भरकटलेल्या थेंबांची वार्‍यावर उधळण
मावळत्या प्रकाशाचे भरडलेले दळण !
सोनेरी प्रकाशाचा आनंदी आल्हाद
देखण्या दैदिप्याने साधला संवाद 

मित्रांच्या सोबतीमधली स्वछंदी रंगत
कोकणातल्या पावसाची झकास संगत

Thursday, June 13, 2013

बाप


शेतामधी माझी खोप,
 तिला बोराटिची झाप.
 तेथे राबतो कष्टतो ,
माझा शेतकरी बाप.

लेतो अंगावर चिंध्या
खातो मिरची भाकर
काडी उसाची पाचट
जगा मिळाया साखर

काटा त्याचाच का पायी
त्यानं काय केलं पाप
शेतामधी माझी खोप,
 तिला बोराटिची झाप.

माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रात दिसं काम धंदा

कष्ट  सारे त्याच्या हाती
दुसरयाच्या हाती  माप
 शेतामधी माझी खोप,
 तिला बोराटिची झाप

बाप  फोडितो लाकडं
माय पेटाविते चूल्हा
घामा मागल्या पिठाची
काय चव सांगू तुला

आम्ही कष्टाचच  खातो
जग करी हापाहाप
शेतामधी माझी खोप,
 तिला बोराटिची झाप

 ---  इंद्रजीत भालेराव