Amazon

Showing posts with label joke. Show all posts
Showing posts with label joke. Show all posts

Tuesday, June 25, 2013

विखी वूखू वेक्खे.............full of laugh





संपूर्ण संवाद :
धनाजी रामचंद्र वाकडे आयला वाकड्यात शिराव लागणार वाटतंय
जवळकर: माळी...... मालक कुठंय ......
वाकडे: मीच मालक आपण कोण ....
जवळकर: मी.... मला ओळखल नाही.... अजब आहे हा हा हा
ती बाहेर उभी आहे ती मरसडीज गाडी कुनाचीये....
वाकडे: नाय माझी नाय...
जवळकर: तुमची नाय... माझिये ...
दिल्ली, कलकत्ता, मद्रास, बेंगलोर तिथे मोठमोठी पंचतारांकित
हॉटेल्स आहेत कुणाची आहेत माहितीये ....
वाकडे: नाय माझी नाय...
जवळकर: तुमची नाय... मग माझी असतील बहुतेक...
इंटरन्याशनल कनस्ट्रक्शन कंपनी कोणाचिये...
वाकडे: कुनाचीका आसना आपल्याला काय करायचं...
जवळकर: हाड त्याचा आयला... ए माझीये ...
दार्जीलिंग डायमंड हिऱ्यांचा व्यापार करणारी सर्वात मोठी कंपनी कुनाचीये
वाकडे: अर्थात हिऱ्यांची...
जवळकर: (विखी वूखू) माझीये ...
तसा मी दानवीर, कर्मवीर, धर्मवीर आणि बरेच काही वीर
उद्योग भूषण यदुनाथ जवळकर
जरा लांब उभे राहा... लांब उभे..... राहा लांब उभे राहा...
वाकडे: जवळकर म्हणजे तुम्ही आमचा महेश जवळकर....
जवळकर: बाप आहे त्याचा....

"धूमधडाका" हा मराठी मधला अशक्य विनोदी चित्रपट आहे. ज्यांनी हा चित्रपट बघितला नाही अशा लोकांचं आयुष्य फुकट आहे. आजही या चित्रपटामधल्या प्रत्येक डायलोग पाठ असणारे बरीच लोक आहेत

Friday, October 12, 2012

GREAT SANTA !!

GREAT SANTA !!

Interviewer: what is your birth date?
Santa: 13th October
Which year?
Santa: Oye ullu ke pathe___ EVERY YEAR

=D

Manager asked Santa at an interview.
Can you spell a word that has more than 100 letters in it?
Santa replyed: -P-O-S-T-B-O-X.

=D

After returning back from a foreign trip, Santa asked his wife,
Do I look like a foreigner?
Wife: No! Why?
Santa: In London a lady asked me Are you a foreigner?

One tourist from U.S.A. asked Santa:
Any great man born in this village???
Santa: no sir, only small Babies!!!

=D

Lecturer: write a note on Gandhi Jayanthi
So Santa writes, "Gandhi was a great man, but I don't know who is Jayanthi.

=D

Interviewer: just imagine you are on the3rd floor, it caught fire
and how will you escape?
Santa: its simple. I will stop my imagination!!!

=D

Santa: My mobile bill how much?
Call centre girl: sir, just dial 123to know current bill status
Santa: Stupid, not CURRENT BILL my MOBILE BILL.

=D

Santa: I think that girl is deaf..
Friend: How do u know?
Santa: I told I Love her, but she said her chappals are new

=D

Friend: I got a brand new Ford IKON for my wife!
Santa: Wow!!! That's an unbelievable exchange offer!!!

=D

Santa in airplane going 2 Bombay ..
While its landing he shouted: " Bombay .. Bombay "
Air hostess said: "B silent."
Santa: "Ok.. Ombay. Ombay"

=D

Teacher: "What is common between JESUS, KRISHNA , RAM, GANDHI and BUDHA?"
Santa: "All are born on government holidays...!!!

=D

Sir: What is difference between Orange and Apple?
Santa: Color of Orange is orange, but color of Apple is not APPLE
=D

Friday, October 7, 2011

रजनी. The Name is enough.


गणपतीच्या घरी 10 दिवस रजनीकांतची स्थापना केली जाते.



संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल.



एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.



अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले होते, ‘रजनी कान्ट!’



एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल?



रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला.



एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं म्हणे!



रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.



एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ‘‘उगाच थरथर कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत जगात काहीही नसतं!’’



एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.



‘रोबो’ सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला चार स्टारचे रेटिंग दिले.



देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो ‘अरे रजनीकांता’ असे उद्गारतो.



रजनीकांत घडय़ाळ घालत नाही. कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.



त्सुनामी कशा तयार होतात.. अर्थातच, समुद्राच्या पोटात भूकंप झाल्यामुळे.. प्रत्येक गोष्ट रजनीकांत करेल की काय?



लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली.. ती जागा आज ‘एस्सेलवर्ल्ड’ म्हणून प्रसिद्ध आहे.



न्यायदेवतेने एकदा रजनीकांतकडे क्रुद्ध नजरेने रोखून पाहिले होते.. ती आजतागायत आंधळी आहे.



रजनीकांत खिडकी उघडी ठेवून एसी चालू करतो, तेव्हा देशात हिवाळा सुरू होतो.



रजनीकांतशी गप्पा मारताना.. राज ठाकरेही तामिळ बोलतात.



पॉवर ऑफ रजनीकांत! तुम्ही रजनीकांतचा जोक एका माणसाला फॉरवर्ड करता.. तो एका तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचतो.



इजिप्तमधील पिरॅमिड हे खरेतर रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.



रजनीकांतचा फोन व्हायब्रेटर मोडवर असला, तरी कोयना धरणाला धोका नाही.
-कार्यकारी अभियंता, कोयना धरण विभाग



मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते.. कारण, तेव्हा रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो.



रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली.. शाळेने तो दिवस रविवार असल्याचे जाहीर करून टाकले.



रजनीकांतला एकदा एका रिपोर्टरने विचारले, ‘‘मोबाइल आणि इंटरनेटवर फिरणाऱ्या रजनीकांत जोक्सविषयी तुझं मत काय?’’रजनीकांतने गंभीरपणे प्रतिप्रश्न केला, ‘‘तुला खरंच वाटतं की ते काल्पनिक विनोद आहेत म्हणून?’’



संता-बंता आत्महत्या करणार आहेत. रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.



रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.



रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.



प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते, ते परतच केले नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.



एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली.. सायकलचालक रजनीकांत फरारी झाला आहे.



रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले.. भारतात बसून, ब्लूटुथवरून.



‘‘बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,’’ आईने ओरडून सांगितले.
रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.



रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.’’दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’



प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.’’प्रोफेसर म्हणाले, ‘बाप रे, तुझं नाव काय?’’
‘‘सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.’’



‘‘आई आई, तो बघ तारा तुटला!’’
‘‘नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही. रजनीकांतने एखादा दगड फेकून मारला असेल सूर्याला नाहीतर चंद्राला!’’



एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली.. आज जग त्याला बॉबी डार्लिग या नावाने ओळखते.



एकदा रजनीकांत पावसात क्रिकेट खेळत होता.. त्या दिवशी खेळामुळे पाऊस थांबवण्यात आला.



एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले आणि लष्कराकडून काही सैनिक मागवून घेतले.. त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.



एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला, ‘‘आय अ‍ॅम बाँड, जेम्स बाँड.’’ त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून मारली. बाँड जागीच गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘आय अ‍ॅम कांत, रजनीकांत. येन्ना रास्कला.’’



एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली. ती एका ग्रहावर जाऊन पडली. तो ग्रह धडाडून पेटला.. त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. सिगारेट फेकणा-या माणसाचं नाव सांगायलाच हवं का?



एकदा रजनीकांतने संतापून झाडू मारणा-या एका पो-याला लाथ मारली.. तो झाडूसह आकाशात फेकला गेला.. आज लोक त्याला हर्री पोट्टर म्हणून ओळखतात.



एकदा रजनीकांत कपातून चहा पीत होता. तो त्याला जरा जास्त झाला. त्याने हातातल्या सुरीने चहा अर्धा कापला.. तीच जगातली पहिली ‘कटिंग चाय’ होती.



हृतिक रोशनने रजनीकांतशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला.. ‘गुजारिश’मध्ये बिचा-यावर संपूर्ण सिनेमाभर व्हीलचेअरमध्ये बसून राहण्याची पाळी आली.



एकदा रजनीकांतने अलका कुबलला एक तास हसवले!!! तेव्हापासून तिला मराठी पिक्चर भेटने बंद झाले - बिच्चारी !



रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’ रजनीकांतने विचारलं, ‘‘नेटमध्ये भोकं किती असतात?’’



ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही ‘रजनीकांत’ असं उत्तर देणार होतात, हो ना? पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही.
दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो.



रजनीकांत कॉलेजात शिकत होता तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.



कांद्याच्या किंमती इतक्या भडकल्यात की आता रजनीकांतनेही जैन व्हायचं ठरवलंय.



एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ‘ढिशक्यांव!!!!’



सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती.. जो पैज हरेल, त्याने उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर घालायची असं ठरलं होतं..



‘मिशन इम्पॉसिबल’ हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला होता.. रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!



एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?.. ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?



रजनीकांतने एकदा आत्मचरित्र लिहिले.. त्यालाच आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या नावाने ओळखतो.



मानवतेवर उपकार करा आणि रजनीकांतवरचे वेडेवाकडे विनोद एकमेकांना फॉरवर्ड करणे बंद करा.. नाहीतर.. नाहीतर तो एखाददिवशी संतापून इंटरनेटच डिलिट करून टाकेल!!



नव्या वर्षाची भेट
फेकिया कंपनीचा नवीन रजनी सिरीजचा ताकदवान आर-11 मोबाइल
एकावेळी 10 सिमकार्ड सामावून घेणारा
500 जीबी मेमरी
320 मेगापिक्सल कॅमेरा
शिवाय टीव्ही, फ्रिज, एसी आणि कार.. एकाच मोबाइलमध्ये



2012 सालापर्यंत जगभरातील लोक कम्प्यूटरमध्ये अतिशय ताकदवान हार्डडिस्क वापरू लागतील.. जिची क्षमता मेगा बाइट्स, किलोबाइट्स किंवा गिगाबाइट्समध्ये नव्हे, तर रजनीबाइट्समध्ये मोजली जाईल.



आदर्श सोसायटीच्या बद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधींना काय स्पष्टीकरण दिले?.. ‘‘ती इमारत सहाच मजल्यांची होती मॅडम. रजनीकांतने खेचून 31 मजल्यांची केली!!!’



चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?.. कारण, दक्षिणेला रजनीकांत आहे!!!



रजनीकांतचा जन्म 30 फेब्रुवारी रोजी झाला.. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याने ती तारीख कोणालाही दिली नाही.



रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली.. तिलाच आपण आज ‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो.



रजनीकांत जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आला होता, तेव्हा त्याला विचारण्याच्या योग्यतेचा प्रश्न विचारण्यासाठी कम्प्यूटरला हेल्पलाइनची मदत घ्यावी लागली होती.



गॅलिलिओने दिव्याखाली अभ्यास केला.
ग्रॅहॅम बेलने अभ्यासासाठी मेणबत्ती वापरली.
शेक्सपीयरने रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला, हे सर्वानाच ठाऊक आहे.
रजनीकांत मात्र केवळ उदबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून शिकला, हे फारसं कोणाला माहिती नाही.