संगीत देवबाभळी - मस्त नाटक.
समीक्षा वगेरे लिहिणे हा आपला प्रांत नाही पण तरीही एक
सच्चा रसिक, साहित्यप्रेमी आणि नाट्यप्रेमी असल्यामुळे नाटकाबद्दल ख़ूप काही लिहावसं वाटतंय म्हणून ही उठाठेव.
नाटक, साहित्य आणि संत तुकाराम यांचे काव्य हे माझे weak पॉइंट आहेत. ज्यांचे कनेक्शन डायरेक्ट हृदयाशी आहे, त्यामुळे नाटक पाहताना आज रुमाल भिजणार आहे हे पहिल्या प्रवेशामधेच ओळखलं. पूर्ण नाटकात आपण वेदनेच्या आनंदात न्हाऊन निघतो. डोळे आणि कान तृप्त होतात, अगदी नाटकाच्या पाहिल्या वाक्यापासुन ते शेवटच्या वाक्यापर्यन्त खिळुन राहतो. काही कलाकृतींना डोळ्यानी दाद मिळते हे ऐकून होतो त्याचा आज प्रत्यय आला. कलावंत फक्त दोनच आहेत पण त्यांची अभिनय आणि संगीत नाटकामुळे गायन खुपच सुंदर. संपूर्ण नाट्यग्रह हेलावून टाकण्याची क्षमता आहे त्यांच्या मधे. एखाद्या वक्त्याने टाळी मिळवण्यासाठी आपल्या भाषणात ज्ञानेश्वरीची एखादी ओवी सांगावी तसे पहिल्या वाक्यापासुन ते शेवटच्या वाक्यापर्यंत संवाद, कधी टाळ्या तर कधी आपोआप 'वाह' येऊन जातं आणि त्यासोबतच साचलेल्या कित्येक भावनांची वाट मोकळी होते आणि आपण मोकळे होतो. देवबाभळीचा काटा कधी आपल्यात घुसतो कळत नाही आणि ती वेदना कायम हवीहवीशी वाटत राहते, वाटतं नाटक संपुच नये.
संत तुकाराम आणि विठ्ठल यामधे भक्त कोण आणि देव कोण असा प्रश्न पडावा इतकी दोघांमधली एकरूपता दाखवण्यात नाटक यशस्वी झालेलं आहे.
नाट्यप्रेमी असल्याने खुप नाटकं पाहतो पण महाराष्ट्रात जन्मल्याचा अभिमान आणि पुण्यात राहतो याचा आनंद खुप दिवसांनी झाला तो आजच्या या नाटकामुळे. कारण अशी सुंदर कलाकृती पाहायला मिळणं म्हणजे दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल. आता हे नाटक परत एकदा पहावाच लागेल, तोपर्यंत मन स्वस्थ बसणार नाही.
नाटक संपल्यावर नटसम्राट मधलं शेवटच वाक्य आपण स्वतःशीच बोलतो,
" अस नाटक असतं राजा, अस नाटक असतं !!! "
- नाट्यप्रेमी मी.

No comments:
Post a Comment