माझ्याबद्दल अशी एक हकिगत सांगितली जाते
की, माझे लहानपण अत्यंत गरिबीत गेले.
खरे म्हणजे
गरिबीत वगैरे काही गेले नाही, पण आजच्याइतके ते
चांगल्या स्थितीत गेले नाही एवढे मात्र
निश्चित !
की, माझे लहानपण अत्यंत गरिबीत गेले.
खरे म्हणजे
गरिबीत वगैरे काही गेले नाही, पण आजच्याइतके ते
चांगल्या स्थितीत गेले नाही एवढे मात्र
निश्चित !
पण तेव्हाही आम्हांला आम्ही गरीब
आहोत ह्याची आठवण व्हायला फुरसत नसायची.
आज काय बालगंधर्वाचे गाणे आहे, पळा तिकडे !
उद्या काय सी.के.नायडूंची मॅच आहे, जा तिकडे. मग
कधी ती झाडांवर चढून बघ, तर
कधी दुसऱ्याच्या गच्चीवरुन ! (फुकट बघायला मिळते
म्हणून.) आमच्या पाठीमागे इतकी व्यवधाने असत
की आमच्या गरिबीचीसुद्धा आम्हांला आठवण
होत नसे.
ह्याबाबत टागोरांची एक कविता सांगतो.---एक
माणूस असतो. त्याच्या गळ्यात एक
लोखंडाची साखळी असते.
ती सोन्याची करण्यासाठी त्याला परीस
शोधायचा असतो. समुद्राच्या काठाने
जाताना तो सारखा दगड घ्यायचा,
साखळीला लावायचा आणि खाली टाकून
द्यायचा ! असे करता करता निराश होऊन खूप पुढे
गेल्यावर त्याने सहज साखळीला हात लावून
पाहिला तर ती केव्हाच
सोन्याची झालेली होती ! त्याच्या हातातून
परीस केव्हाच निसटून गेला होता.
तुमच्याही प्रत्येकाच्या हातात परीस आहे.
कोणाच्या हातात तो चित्रकलेच्या रुपात
आहे,कोणाच्या हातात संगीताच्या रुपाने ! फक्त
त्याकडे नीट बघावयास शिका. याबद्दल मला एक
उर्दू शेर आठवतो---"बगीच्यात फुलांचे ताटवे फुलले
आहेत, गुलाबाची फुले डुलत आहेत, पण त्यांकडे
बघण्यासच कोणी नाही."
------------------- पु.लं.देशपांडेआहोत ह्याची आठवण व्हायला फुरसत नसायची.

No comments:
Post a Comment