एसी ची हवा नको,
झाडाखालची एक थंड झुळूक पुरेसी आहे.
बर्फाचे खडे नकोत,
माठातील वाटीभर थंड पाणी पुरेसं आहे.
वाढदिवसाला मोठासा केक नको,
थोडीसी पेस्ट्री पुरेसी आहे .
दिव्यांचा टिमटिमाट नको,
एक मेणबत्ती पुरेसी आहे .
फटाकड्यांची अतिशबाजी नको,
एक टिकली पुरेसी आहे.
डी ज्जे चा गोंगाट नको,
एक कुसुमाग्रजांची कविता पुरेसी आहे.
गप्पा गोष्टी नकोत,
दोन गोड शब्द पुरेसे आहेत.
तासंतास फोनवर कशाला ?
एक प्रामाणिक विचारपूस पुरेसी आहे.
कचऱ्यानी, प्रेमी युगलान्नी भरलेले पार्क नकोत,
गावाकडचे चांदणे पुरेसे आहे.
मल्टीप्लेक्स मधील सिनेमे नकोत
आजीची गोष्ट पुरेसी आहे.
पिज़्ज़ा,बर्गर नकोत,
मेथीची भाजी आणि भाकरी पुरेसी आहे.
सणावाराला दुकानातील महागडी मिठाई नको
पूरण पोळी पुरेसी आहे.
मोठे, सुगंधी अत्तरे नकोत
देवासमोरिल उदबत्ती पुरेसी आहे
दररोज ची पोपट पोपटपंची नको
एक आठवण पुरेसी आहे .
महागडी गिफ्ट्स नकोत .
सोबतीचे दोन क्षण पुरेसे आहेत .
आयुष्यभराची साथ मिळेल याची अपेक्षा नाही
आयुष्य भर जीण्यासाठी दोन क्षण पुरेसे आहेत.
------------- परमू
झाडाखालची एक थंड झुळूक पुरेसी आहे.
बर्फाचे खडे नकोत,
माठातील वाटीभर थंड पाणी पुरेसं आहे.
वाढदिवसाला मोठासा केक नको,
थोडीसी पेस्ट्री पुरेसी आहे .
दिव्यांचा टिमटिमाट नको,
एक मेणबत्ती पुरेसी आहे .
फटाकड्यांची अतिशबाजी नको,
एक टिकली पुरेसी आहे.
डी ज्जे चा गोंगाट नको,
एक कुसुमाग्रजांची कविता पुरेसी आहे.
गप्पा गोष्टी नकोत,
दोन गोड शब्द पुरेसे आहेत.
तासंतास फोनवर कशाला ?
एक प्रामाणिक विचारपूस पुरेसी आहे.
कचऱ्यानी, प्रेमी युगलान्नी भरलेले पार्क नकोत,
गावाकडचे चांदणे पुरेसे आहे.
मल्टीप्लेक्स मधील सिनेमे नकोत
आजीची गोष्ट पुरेसी आहे.
पिज़्ज़ा,बर्गर नकोत,
मेथीची भाजी आणि भाकरी पुरेसी आहे.
सणावाराला दुकानातील महागडी मिठाई नको
पूरण पोळी पुरेसी आहे.
मोठे, सुगंधी अत्तरे नकोत
देवासमोरिल उदबत्ती पुरेसी आहे
दररोज ची पोपट पोपटपंची नको
एक आठवण पुरेसी आहे .
महागडी गिफ्ट्स नकोत .
सोबतीचे दोन क्षण पुरेसे आहेत .
आयुष्यभराची साथ मिळेल याची अपेक्षा नाही
आयुष्य भर जीण्यासाठी दोन क्षण पुरेसे आहेत.
------------- परमू
No comments:
Post a Comment