Amazon

Thursday, February 9, 2012

Interview with Warren Buffet

                                              Interview with Warren Buffet

वॉरन बफे या जगातील सवार्त श्रीमंत व्यक्तीने नुकताच ३१ बिलीयन डॉलर्स सामाजीक कायार्साठी दान केले.
त्यांच्या सी.एन्.बी.सी. (CNBC) या वाहिनीवर झालेल्या मुलाखतीतील, त्यांच्या आयुष्यातील काही
महत्त्वपूर्ण  मुद्द्यांवर प्रकाश  टाकणारा हा भाग खास तुमच्यासाठी, ते देखिल  मराठीत - 
१.त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात  गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि  तरी देखिल आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे .
२. वृत्त पत्रे  विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक
छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.
३. ते आजही मिड  टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षापूर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्याघराला कुंपणाची भिंत  नाही.
४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षा रक्षकांची गरज नाही.
५. वॉरन बफे जगातील सवार्त मोठ्या विमान कंपनीचे मालक आहते . पण ते कधीही स्वतंत्र  विमानाने प्रवास करत नाहीत.
६. त्यांची कं पनी बकर्शायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत  . या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला  एक पत्र  लिहतात. सर्व CEO's ना त्यांनी दोन नियम सांगितले आहेत . पहिला नियम  कधीही आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पाहिला नियम विसरु नका.
७. त्यांना इतर उच्च वर्गियाँबरोबर वेळ व्यतीत करणे आवडत नाही. घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न  बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.
८. बिल गेट्स या जगातील दुसरया श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षापूर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटले की वॉरन बफें बरोबर बोलण्या सारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मिटींग साठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र  प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेटस हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.
९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत.तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला - "क्रेडिट कार्ड  पासुन दरु रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा."
-- पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.
-- जितकी साधे जीवनमान राखता येइल  तितके साधे रहा.
-- ऐकावे जनाचे करावे मनाचे.
--  ब्रैंड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
-- अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment