नाटक - अनन्या
नावाप्रमाणेच अनन्यसाधारण अस नाटक आहे.
नाटकाबद्दल काय बोलणार, अशी नाटकं पहायचे योगायोग फार दुर्मिळ, दुर्मिळ या कारणाने की अशी नाटकं येतात त्यावेळी त्या बद्दल जास्त माहिती नसते ( आपलीच चुक , कारण चांगल्या गोष्टी आपल्याला खुप उशीरा कळतात). आता पर्यन्त या नाटकाचे 100 च्या वर प्रयोग झाले, नेहमीप्रमाणे जाहिरातही दिसायची (weekend ला नाट्यग्रह visit करायची जुनी सवय असल्याने) हे नाटक एकदा पहावे असा विचार काही येत नव्हता, एखाद्या वेळी मित्राचा ग्रुप येईल भेट होईल, त्यावेळी पाहु वगेरे.. वगेरे. असा विचार झाला असावा.
अशीच चर्चा चालू होती नाटकाबद्दल त्यावेळी समजलं आनंदवन मधे याचा शो झाला होता, म्हणजे नाटक उत्तम असणार म्हणून त्यावेळीच ठरवलं की हे नाटक पुण्यात आल्यावर पहायच.
पुन्हा weekend ला मोकळा वेळ असेल का याचही गणित चालूच असायच. असच योग आला आणि सर्व फ्रेंड्स मिळुन नाटक पहायच ठरलं तरीही माझ फिक्स होत नव्हतं आणि may be I was lucky, नाटक पाहायला वेळ मिळाला.
नाट्काच्या तांत्रिक बाबी, अभिनय, नेपथ्य , संगीत, लाइट्स याविषयी नेहमीप्रमाणे मी बोलणार नाही त्या बेसिक गोष्टी आहेत, नाटकच अप्रतिम असल्याने या गोष्टींवर शंका उपस्थीत करणे शक्यच नाही. एखाद्या प्रेक्षकाला बाहेर पडल्यावर जो आनंद मिळतो त्याविषयीच फक्त बोलतो आहे. तुम्हाला आठवते भूतकाळात कधी इतका आनंद झाला का की ज्यामुळे आनंदाश्रु आले असतील, आणि अश्याच आनंदाचे साक्षीदार पुन्हा व्हायचे असेल तर नक्कीच हे नाटक पहा. मुख्य भूमिका ज्यानी केली त्या 'ऋतुजा बागवे', त्यांच्या बद्दल मला जास्त माहिती नव्हती, फक्त मराठी मालिकांमधे आहे एवढीच माहिती. पण नाटक पाहिल्यावर यांच्याबद्दल आदर वाढला आहे, कारण अतिशय चैलेंजिंग भूमिका त्यानी केलेली आहे, अभिनयाबरोबर वेगळी मेहनत आणि अभ्यासही का गरजेचा आहे ते समजते. असे गुणी कालवंत मराठी मधे आहेत याचा अभिमान वाटतो. नाटकाबद्दल लिहिण्याच कारणं ख़ूप आहेत, नाटक पाहिल्या बरोबर वाटलं याबद्दल लिहावच लागेल, मिळालेल्या आनंदाला शब्द रूप मिळालेच पाहिजे. जसे नाटका मधे एका घटनेमुळे अनन्याचे ( मुख्य भूमिका) आयुष्य बदलले त्या प्रमाणेच पाहण्याऱ्या एखाद्या प्रेक्षकाचेही आयुष्य बदलू शकते. माझ्यासाठी एक आठवण झाले आहे हे नाटक. काही काही क्षणाला अरे 'किती भारी' असेच शब्द बाहेर पडतात heart melting moment काय असते याचा अनुभव येतो.
आयुष्याचे रहाटगाडगे चालूच असते पण नाटक पाहिल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते. म्हणजे तुम्ही सोमवारी ऑफिसला जाताना एक वेगळीच ऊर्जा घेऊन, प्रसन्न आणि आनंदी चेहरा घेऊन जाल. नाटकातले प्रत्येक पात्र हे काही महापुरुष वगेरे नाहीत, तेही आपल्या सारखेच आहेत त्यामुळे ते आपलेसे वाटतात, स्वभाव वैशिष्ट्य पाहुन लक्षात येईलच. मुख्य भूमिकाच फक्त नाही तर बाकी पात्रही तितकिच महत्वाची आणि त्यांचे चांगले काम झाले आहे. ते सहायक कलाकार जरी समोर ठेवून नाटक पाहिले तरी तेही खुप काही सांगून जातात.
नाटक सुरु होण्या अगोदर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली, तांत्रिक कारणाने नाटकाचा प्रयोग सुरु होण्यासाठी 20 मिनिट उशीर झाला होता. आणि ते लक्षात आणून देण्यासाठी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला सुरवात केली. 'आता नाटक सुरु करा अस रागवत न सांगता एक पुणेकर प्रेक्षकांनी एक विनम्र बाजू दाखवून दिली. साधी गोष्ट आहे पण चांगली वाटली म्हणून इथे मांडली. नाटक संपल्यावर प्रमोद पवार धन्यवाद देण्यासाठी बोलत होते, त्यावेळी त्यानी उशीरा नाटक सुरु झाल्याने संपूर्ण टीम कडुन दिलगिरी व्यक्त केली आणि म्हटले नाटकाच्या शेवटी ज्या टाळ्या मिळाल्या त्या खऱ्या टाळ्या आहेत'. प्रेक्षक आणि कलावंत दोन्ही प्रगल्भ असले की असे योगायोग येतात याचा अनुभव आला.
माझ्या सारख्या एखाद्या नाटकवेड्या रसिकाला ह्या नाटकाची माहिती व्हावी म्हणून हा आपला साधा प्रयत्न.
- प्रमोद डमरे.