तू पावसाळी माती,
धुंद कुंद,
सर्दावलेल्या मोसमात,
सुंगंधणारी.
तू सर हिरवी,
शार, बेधुंद
स्वप्नात माझ्या येऊन
भिजवणारी.
-- #3D सुज्या
धडाम धुडूम पडतो हा,
असा कसा वागतो हा
शाळा सुटून चिंचेखाली
बरोबर मला गाठतो हा.
दप्तर ओले, ओल्या वेण्या,
वेडा पिसा वागतो हा
निळी छत्री झाली ओली
तांबड्या रस्त्यावरती.
बुळूक बुळूक गम बूट
वागणे याचे बेछूट
भिजवून मला हसतो आणि
डोळ्यात माझ्या साठतो हा.
--#3D मीनू
ये बघ ना तू, ढग कसे भरून आलेत
चहा वर वाफ सुद्धा रेंगाळतेय क्षणभर .
आळस ठसठसतोय आज, आणि आठवतंय,
तुझ लोळत माझ्या केसांची खेळणं.
आठवतंय खिडकीच्या तावदानावर,
वाजणारी टप टप ऐकत लोळणं.
आता तूच हो पावसाची सर आणि
बरस माझ्या अंगणात,
आणि अशीच ये तुझ्या आठवणीसारखी न सांगता
मी कुठेही गेले तरी.
--#3D रेश्मा.
भजी , बुरजी आणि भावविश्व
माझ्या काही मित्रांना खुप कविता होत होत्या त्या काळची गोष्ट
त्यांच्या प्रेमभंगात रंग फुलले होते त्यात पावसाची भर आणि
भर रस्त्यात बुरजी पावची गाडी, मित्र म्हणायचे -
तिच्या डोळ्यात दाटतो पाऊस,
समोर भजी गरमा गरमआणि इथे खिसे रिकामे.
एखादा नुसताच कवितेच्या ओळीत येऊन झिंगलेला दिसायचा
इथे तिथे नुसती प्रेमाची पिल्लावळ आणि त्यात परत पाऊस
मी म्हणालो बाबा रे पड आता
तुझ्या वैचारिक बांधिलकी विषयी नाही विचारणार कोणी
जमाना तो राहिला नाही, आता फार फार तर
प्रेमकविता, बुरजी आणि भजी मिळतील नाक्यावर तुझ्या नावाची.
--#3D कैवल्ल्या
खूप झालं तुझं , ये पावसा
खूप झालं राव तुझं आता पड नाहीतर,
बघ माझी ठिगळ जोडलेली गोदडी
अंगणात वाळून कागद झाली
पण तुझ्या मऊ ढगांच्या हृदयाचा
एक धागाही नाही उसवला.
माय गेली पावसात तेंव्हा
रुसलो सुद्धा नाही तुझ्यावर
मग आता कारे तुझा असा माज
फुटू दे ना ढग सुटू दे ना
ओली ढिगळ, मग
दाटून येऊ दे पुन्हा
माझ्या मायच्या शिलाई मशीनची शपथ
घेऊन सांगतो तुला एक एक ढग
शिऊन तुझी मऊ रजई परत देईन तुला.
Source: #3D Episode 91
धुंद कुंद,
सर्दावलेल्या मोसमात,
सुंगंधणारी.
तू सर हिरवी,
शार, बेधुंद
स्वप्नात माझ्या येऊन
भिजवणारी.
-- #3D सुज्या
धडाम धुडूम पडतो हा,
असा कसा वागतो हा
शाळा सुटून चिंचेखाली
बरोबर मला गाठतो हा.
दप्तर ओले, ओल्या वेण्या,
वेडा पिसा वागतो हा
निळी छत्री झाली ओली
तांबड्या रस्त्यावरती.
बुळूक बुळूक गम बूट
वागणे याचे बेछूट
भिजवून मला हसतो आणि
डोळ्यात माझ्या साठतो हा.
--#3D मीनू
ये बघ ना तू, ढग कसे भरून आलेत
चहा वर वाफ सुद्धा रेंगाळतेय क्षणभर .
आळस ठसठसतोय आज, आणि आठवतंय,
तुझ लोळत माझ्या केसांची खेळणं.
आठवतंय खिडकीच्या तावदानावर,
वाजणारी टप टप ऐकत लोळणं.
आता तूच हो पावसाची सर आणि
बरस माझ्या अंगणात,
आणि अशीच ये तुझ्या आठवणीसारखी न सांगता
मी कुठेही गेले तरी.
--#3D रेश्मा.
भजी , बुरजी आणि भावविश्व
माझ्या काही मित्रांना खुप कविता होत होत्या त्या काळची गोष्ट
त्यांच्या प्रेमभंगात रंग फुलले होते त्यात पावसाची भर आणि
भर रस्त्यात बुरजी पावची गाडी, मित्र म्हणायचे -
तिच्या डोळ्यात दाटतो पाऊस,
समोर भजी गरमा गरमआणि इथे खिसे रिकामे.
एखादा नुसताच कवितेच्या ओळीत येऊन झिंगलेला दिसायचा
इथे तिथे नुसती प्रेमाची पिल्लावळ आणि त्यात परत पाऊस
मी म्हणालो बाबा रे पड आता
तुझ्या वैचारिक बांधिलकी विषयी नाही विचारणार कोणी
जमाना तो राहिला नाही, आता फार फार तर
प्रेमकविता, बुरजी आणि भजी मिळतील नाक्यावर तुझ्या नावाची.
--#3D कैवल्ल्या
खूप झालं तुझं , ये पावसा
खूप झालं राव तुझं आता पड नाहीतर,
बघ माझी ठिगळ जोडलेली गोदडी
अंगणात वाळून कागद झाली
पण तुझ्या मऊ ढगांच्या हृदयाचा
एक धागाही नाही उसवला.
माय गेली पावसात तेंव्हा
रुसलो सुद्धा नाही तुझ्यावर
मग आता कारे तुझा असा माज
फुटू दे ना ढग सुटू दे ना
ओली ढिगळ, मग
दाटून येऊ दे पुन्हा
माझ्या मायच्या शिलाई मशीनची शपथ
घेऊन सांगतो तुला एक एक ढग
शिऊन तुझी मऊ रजई परत देईन तुला.
Source: #3D Episode 91
No comments:
Post a Comment