Amazon

Wednesday, March 4, 2015

सकाळ २५ फेब्रुवारी २०१५ ...आणि पुन्हा सुरू झाला प्रवास. कष्टाकडून... कष्टाकडे!

उसाची गाडी ओढताना बैलाचे पाय घसरत आहेत, याची कल्पना आल्यानंतर गाडीवान खाली उतरला. त्याने बैलांचे कासरे कारभारणीच्या हातात दिले. पण जे व्हायचे ते झालेच.
 

धन्याने दुसऱ्या बैलाची वेसण सोडली आणि खाली पडलेल्या बैलाला उठविण्याचा प्रयत्न सुरू केला. या आणीबाणीच्या प्रसंगाने गाडीवर मागे बसलेल्या मुलांकडे दुर्लक्ष करण्यास कारभारणीला भाग पाडले.
 

एका हाताने यश येत नाही म्हटल्याने धन्याने दोन्ही हातांनी बैलाला उठविण्याचा प्रयत्न चालविला. तर गाडीवर उभारलेल्या मालकीणीनेही कासरा ओढून हातभार लावला.

बैलाची जिद्द आणि धनी व मालकीणीचे प्रयत्न याची परिणती म्हणजे बैल गुडघ्यावर उभा राहिला.

 बैल उठून उभारल्यानंतर धन्याने प्राधान्य दिले ते बैलाला ‘सापती‘ नव्याने बांधण्याला. तर गाडीवानाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर मालकीणीनेही गाडीवर मागे बसलेल्या चिल्ल्यापिल्ल्यांना सावरले.
 
....आणि पुन्हा सुरू झाला प्रवास. कष्टाकडून... कष्टाकडे!