आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय झाला. मोठ्या लोकांनी खूप म्हटलंय माणसात देव शोधारे बाबा..... आणि आज मला भेटले. देवत्व हे कर्तुत्वावर असते. पण काही स्वयंघोषित पण आहेत तिथे मला देव कधी दिसला नाही. प्रकाश आमटे हे माझे पुस्तक रुपी शिक्षक आहेत. ते जसे निसर्गाला देव मानतात त्याप्रमाणे मलाही निसर्गच आणि माणसाचे कर्तुत्व हेच देवासारखे वाटतात.
काल मला अशीच बातमी मिळाली कि painting exhibition आहे Raja ravivaerma art gallery मध्ये आणि त्याच्या उद्घाटनासाठी प्रकाश आमटे येणार आहेत. मग माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मी लगेच सगळे प्लान cancel केले आणि आज सकाळी मी माझ्या एका मित्राला घेऊन art gallery गाठली. मला वाटले गर्दीमुळे आणि आम्हाला उशीर झाल्यामुळे त्यांना भेटता येणार नाही असे वाटले. आणि चित्राचं प्रदर्शन पाहत असताना अचानक पाठीमागे पहिले तर सर डॉ प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे. त्यांना पहिल्या पहिल्या आजपर्यंत जितका आनंद झाला नव्हता तितका झाला. ज्यांच्याबद्दल आतापर्यंत फक्त पुस्तकातच वाचले होते ते अचानक समोर आल्यावर काय बोलावे काही समजेना. ज्यावेळी मी खचतो त्यावेळी मी त्यांची मला आवडलेली वाक्य वाचतो. त्यावेळी असे वाटते कि किती तरी संकट पार त्यांनी केली आहेत. आपल्यासमोर जे आहेत ती त्या तुलनेत तर काहीच नाहीत. त्यांच्याशी एक दोनच वाक्य बोललो आणि त्यातून मला त्यांचा साधेपणा खूप आवडला. ते असे बोलत होते कि माझी आणि त्यांची पहिल्यापासून ओळख आहे. त्यांना कितीतरी लोक भेटत असतील तरी ते तितक्याच उत्साहाने सर्वांशी तितक्याच प्रेमाने बोलतात. प्रेमावरून आठवले . तुम्हाला माहितच असेल त्यांचा आणि प्राण्यांचा जिव्हाळा. जर माणूस प्रेमळ असेल तर हिंस्र प्राणीही तुमच्याशी तितकेच प्रेम करतो. प्रेमावरती खूप चित्रपट पहिले. खूप पुस्तके वाचली पण असे उदाहरण नाही. मंदाताई आमटे यांच्या विषयी बोलायचं म्हटले तर खूप मोठी पोस्ट तयार होईल. त्यासाठी तुम्ही पुस्तकच वाचा असे म्हणेन.मी वाचनाची सुरवात केली ती विलास मनोहर यांच्या "मला न कळलेले बाबा " ह्यापासून आणि आणि आता सर्वच पुस्तके वाचावी असा निर्धार केला आणि प्रकाश आमटे,विलास मनोहर, साधनाताई आमटे यांची मी न वाचलेली सर्व पुस्तके विकत घेतली. आता दोन महिने पुरतील तितकी आहेत. आता फक्त बाबा आमटे यांनी लिहिलेली पुस्तके विकत घायची राहिली आहेत.बाबा आमटेंच एक वाक्य मला खूप आवडते "तुम्ही जगाकडे पाठ फिरवा ,जग तुमच्या पाठीशी राहील" आणि त्याचा परिणाम आज आपण पाहतच आहोत.